पुणे : पर्यटनासाठी लोणावळ्यामध्ये गेलेल्या अन्सारी आणि सय्यद कुटुंब पाहण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोणावळ्यामध्ये नविन नियमावली लागू केले आहेत. लोणावळ्यामध्ये अन्सारी आणि सय्यद कुटुंब ज्या भागातून वाहून गेले त्या भागामध्ये आता पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर प्रशासनाने लोणावळ्यासाठी विशेष नियमावली लागू केली आहे. लोणावळ्यामधील काही परिसरामध्ये जाण्यास पर्यटकांना ३१ ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाने नव्यानं पाच नियम रात्री बारा पासून लागू केलेले आहेत.
मावळ तालुक्यातील सहारा ब्रिज, सहारा ब्रिज समोरील तीन छोटे धबधबे, भूशी डॅम, भूसी डॅम रेल्वे विभागाच्या गेस्ट हाऊस वरचा भाग, भूशी डॅम येथील west woir च्या वरचा भाग, टायगर पॉइंट, लायन्स पॉईट, शिवलिंग पॉईंट इत्यादी ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गर्दीच्या पर्यटन ठिकाणामधील काही धोकादायक ठिकाणे प्रतिबंधित करणे आवश्यक आहे
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर लागू केलेली नियमावली
सहारा पुलावर वाहने पार्किंग करण्यासाठी पुर्णपणे प्रतिबंधित करण्यात आला आहे. सहारा पुलाच्या समोरच्या बाजूला असलेल्या ३ छोटया धबधब्याच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी पुर्णपणे प्रतिबंधित केले आहे.
भूशी धरणाच्या रेल्वेच्या गेस्ट हाऊस पासून वरच्या बाजूला जाण्यासाठी गेस्ट हाऊस पासून पुर्णपणे प्रतिबंधित केले आहे.
भूशी धरणाच्या west weir च्या डाव्या बाजूने वन विभागच्या जागेतून वरच्या बाजूच्या धबधब्याकडे जाण्यासाठी पुर्णपणे प्रतिबंधित केले आहे.
लायन्स पॉईट / टायगर पॉईट शिवलिंग पॉईट येथे सायंकाळी ६ वाजल्यापासून सकाळी ६ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
पर्यटकांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी नेमून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. हुल्लडबाजी करणऱ्या तरुणांवर आणि इतर पर्यटांना त्रास होईल असे वर्तन, हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही. अशांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील प्रशासनाने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांना बालेकिल्ल्यात बसणार आणखी मोठा धक्का; कट्टर समर्थकाने घेतली शरद पवारांची भेट
-पुण्यातील मेट्रो स्थानकावर घडली मोठी घटना; प्रवाशाला गमवावा लागला जीव, वाचा नेमकं काय झालं?
-‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, लाभ घेण्यासाठी काय करायचं? वाचा…
-Pune Metro: पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत दुपटीने वाढ; एका दिवसांत किती लाख रुपयांची कमाई?