मुंबई : महाराष्ट्र राज्य विधी मंडळाचे पवासाळी अधिवेशन सध्या सुरु असून आज अधिवशनाचा पाचवा दिवस आहे. नुकत्याच राज्य सरकारने महिलांच्या सबलीकरणासाठी सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ जाहीर केली आहे. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली आहे. यावरुन बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘राज्यातील माता भगिनींचे आयुष्य उजळून टाकणाऱ्या योजना आणल्या. राज्यातील महिला, शेतकरी, वारकरी, युवक, मुली, तसेच समाजातील इतर घटकांसाठी योजना आणल्या. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’चा जीआर आपण काढला. या योजनेतून महिन्याला १५०० रुपये आणि वर्षाला १८ हजार रुपये आमचं सरकार देणार आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
# Live📡| 02-07-2024
📍विधान भवन, मुंबई📹 राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन, दिवस पाचवा- विधानसभेतून लाईव्ह
https://t.co/dBaqfPpgqQ— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 2, 2024
“खरंतर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ या योजनेचा विरोधकांना आनंद व्हायला हवा होता. पण जनतेला काही द्यायचं म्हटलं तर विरोधकांच्या पोटात का दुखतं, हे मला आजही कळलेलं नाही. चांगल्याला चांगलं म्हणायचं असतं. कौतुक करता येत नसेल तर निदान बिन बुडाची टीका तरी विरोधकांनी करू नये. मी, दोन उपमुख्यमंत्री तसेच महायुतीच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून राज्यातील महिला भगिनींना आम्हा सर्व भावंडांकडून माहेरचा आहेर दिला आहे. आणि तो आम्ही नियमित देत राहणार आहोत”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
“कुणीही सरकारी कर्मचारी बहिणीकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला निलंबित करुन जेलमध्ये टाकू. माता-भगिनींनी एक रुपया द्यायचा नाही. जो मागत असेल, त्याची तक्रार करा. जेलमध्ये टाकू, बाहेर येऊ देणार नाही. लाडकी बहिण योजनेनंतर काही जण म्हणाले, लाडक्या भावांच काय? असं विचारत आहेत, ज्यांना सख्खे भाऊ समजले नाही, त्यांच कसं व्हायच? त्यांना लाडकी बहिण योजना कशी कळणार?” असं एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांना बालेकिल्ल्यात बसणार आणखी मोठा धक्का; कट्टर समर्थकाने घेतली शरद पवारांची भेट
-पुण्यातील मेट्रो स्थानकावर घडली मोठी घटना; प्रवाशाला गमवावा लागला जीव, वाचा नेमकं काय झालं?
-‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, लाभ घेण्यासाठी काय करायचं? वाचा…
-Pune Metro: पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत दुपटीने वाढ; एका दिवसांत किती लाख रुपयांची कमाई?
-विधान परिषदेत आंबादास दानवे आक्रमक; भाजपच्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ