पुणे : राज्याच्या विधीमंंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकाने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पामधून राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजपासून ऑफलाईन अर्ज स्विकारण्यास सुरुवात केली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी वर्षाला २ लाख ५० हजार ५०० रुपये पेक्षा कमी उत्पन्न असा निकष आहेत.
लाडकी बहीण योजनेचे निकष काय?
- किमान वयाची२१ वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत.
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं आवश्यक आहे.
- सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम २.५० लाखांपेक्षा जास्त नसावं.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
- योजनेच्या लाभासाठी पोर्टल/ मोबाईल अॅपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल.
आवश्यक कायदपत्रे काय?
- लाभार्थ्यांचं आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला
- सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत असणं अनिवार्क (5) बँक खातं
- पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रेशनकार्ड
- सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र
दरम्यान, राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जाहीर केल्यापासून राज्यामध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व महिलांंची कागदपत्रे जमवण्यासाठी लगबग सुरु आहे. पात्र महिलांची नोदंणी लवकरात लवकर करून त्यांना योजनेचा लाभ देण्याचे मोठे आव्हान या राज्य शासनासमोर आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Metro: पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत दुपटीने वाढ; एका दिवसांत किती लाख रुपयांची कमाई?
-विधान परिषदेत आंबादास दानवे आक्रमक; भाजपच्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ
-पुणेकरांनो सावधान! आणखी एका गर्भवती महिलेला झिकाची लागण; रुग्णसंख्या ६ वर पोहचली
-भुशी डॅम दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय; पर्यटकांना संध्याकाळी संचारबंदी
-टिळेकर सुटले! हडपसरमध्ये अजितदादांच्या तुपेंना की शिंदेंच्या भानगिरेंना संधी?