मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळामध्ये चांगलाच गदारोळ सुरु आहे. त्यातच विधान परिषदमध्ये बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. अंबादास दानवे यांच्याकडून आज विधानपरिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ तसेच बोट तोडण्याचा अधिकार असल्याची भाषा देखील वापरण्यात आली आहे.
“माझा तोल सुटलेला नाही. माझ्यावर बोट केलं तर मला बोट तोडण्याचा अधिकार आहे. मी विरोध पक्षनेता नंतर आहे, आधी शिवसैनिक आहे. बाटगा प्रसाद लाड मला हिंदूत्व शिकवणार आहे का? पक्षात धंद्यासाठी हा माणूस काम करतो. माझ्यावर बोट दाखवून बोलतो. सभापतींना बोल मला बोट का दाखवतो? तो कसा मला राजीनामा मागू शकतो? माझे पक्षप्रमुख निर्णय घेतील. राहुल गांधींचा विषय विधान परिषदेत का काढला? मला पश्चाताप नाही, माझा शिवसैनिक जागा झाला आहे. माझ्यावर सुद्धा केसेस आहेत. हिंदुत्वासाठी केसेस घेतल्या आहेत. हे शेपूट घालून पळणारे हिंदुत्ववादी आहेत”, असे म्हणत आंबादास दावने विधान परिषदेमध्ये आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
दरम्यान, ‘मला उपसभापती बोलू देत नाहीत, असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला. त्यांनी विरोधकांनी “पक्षपातीपणा करणाऱ्या उपसभापतींचा धिक्कार असो”, अशा घोषणाही दिल्या. त्यानंतर विरोधकांनी आरडा-ओरडा बंद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असे विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो सावधान! आणखी एका गर्भवती महिलेला झिकाची लागण; रुग्णसंख्या ६ वर पोहचली
-भुशी डॅम दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय; पर्यटकांना संध्याकाळी संचारबंदी
-टिळेकर सुटले! हडपसरमध्ये अजितदादांच्या तुपेंना की शिंदेंच्या भानगिरेंना संधी?
-विधान परिषदेसाठी भाजपची यादी जाहीर; योगेश टिळेकरांसह आणखी ४ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब