पुणे : पुणे शहरात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहरातील एरंडवणे भागामध्ये झिका व्हायरसची लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. एरंडवणे भागातील ३५ वर्षीय वर्षाच्या गर्भवतीला झिकाची लागण झाली असल्याचे आता समोर आले आहे. गर्भवती महिलेचा अहवाल साेमवारी पाॅझिटिव्ह आला आहे.
झिकाची लागण झालेली गर्भवती महिला एरंडवणेमधील गणेशनगर येथील रहिवाशी आहे. ही महिला १६ आठवडयांची गर्भवती असून या महिलेला संसर्ग झाल्याने तिच्या बाळामध्ये विकृती निर्माण हाेण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता शहरात झिका रुग्णांची वाढती संख्या पाहून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील एकूण झिका पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ६ झाली आहे. त्यापैकी दाेन महिला गर्भवती आहेत. तर शहरातील फक्त एरंडवणे परिसरामध्ये रुग्णांची संख्या ४ झाली आहे.
एरंडवणे परिसरामध्ये २१ जून रोजी २ रुग्ण आढळले होते. ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या १५ वर्षांच्या मुलीला झिकाची लागण झाली होती. त्यानंतर मुंढवा परिसरामध्ये ४७ वर्षीय महिला आणि तिच्या २२ वर्षांच्या मुलाला झिका व्हायरसची लागण झाली. एरंडवणेतील गणेशनगर येथील २८ वर्षीय गर्भवतीला लागण झाली आहे. आता त्यामध्ये आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे आता पुणेकरांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भुशी डॅम दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय; पर्यटकांना संध्याकाळी संचारबंदी
-टिळेकर सुटले! हडपसरमध्ये अजितदादांच्या तुपेंना की शिंदेंच्या भानगिरेंना संधी?
-विधान परिषदेसाठी भाजपची यादी जाहीर; योगेश टिळेकरांसह आणखी ४ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब
-संभाजी भिडेंचं ‘ते’ व्यक्तव्य अन् गिरीश महाजनांनी जोडले कोपऱ्यापासून हात, नेमकं काय घडलं?