पुणे : पावसाळा आला की अनेक जण फिरायला जात असतात. उत्साहाच्या भरामध्ये किंवा मग व्हिडीओसाठी स्टंटबाजी करत असतात. अशा प्रकारातून दुर्दैवी घटना घडत असतात. नुकतेच पर्यटनासाठी लोणावळ्याला भुशी डॅमला फिरायला गेलेल्या एका कुटुंबामधील सर्वजण पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झालाय तर एकाचा शोध सुरू आहे. ही घटना ताजी असताना पुण्यातील ताम्हिणी घाटातील एक दुर्घटना समोर आली आहे.
ताम्हिणी घाटात एक तरुण वाहून गेल्याची आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा तरुण आपल्या जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. स्वप्नील धावडे असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. स्वप्नील धावडे हा तरुण आपल्या जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता.
अतिउत्साह, वेगळेपणा दाखविण्याची धडपड आणि पाण्याच्या ताकदीकडे केलेले दुर्लक्ष !
अजून काय म्हणायचे .. ?
स्थळ : ताम्हिणी अभयारण्य (धबधबा न सांगितलेले बरे) शनिवारी झालेला अपघात
Video Source: @PuneForest #Monsoon #tourism #tamhini #tourist #pune #forest #Jungkook #Maharashtra pic.twitter.com/tYcAtEDRTb— Chaitrali Chandorkar (@chaitralicMT) June 30, 2024
शनिवारी पर्यटनासाठी ताम्हिणी घाटामध्ये स्वप्नील हा पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील रहिवाशी आहे. ताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो उंचावरून धबधब्यात उडी मारताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-संभाजी भिडेंचं ‘ते’ व्यक्तव्य अन् गिरीश महाजनांनी जोडले कोपऱ्यापासून हात, नेमकं काय घडलं?
-विठुरायाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांचा टेम्पो उलटला; २० जखमी, नेमका काय प्रकार?
-काकांचा पुतण्याला धक्का; पुण्यातील नगरसेवक करणार ‘शरद पवार गटा’त प्रवेश
-‘लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत…’; ‘सामना’तून अजित पवारांवर ताशेरे
-पुण्यात बनावट पोलिसांकडून नागरिकांना चक्क बंदुकीने मारहाण; व्हायरल व्हिडिओवर नागरिकांचा संताप