पुणे : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असतात. संभाजी भिडे यांनी पुण्यामध्ये केलेल्या आणखी एका वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. ‘आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे हंडग आहे’ असे संभाजी भिडे म्हणाले आहेत. भिडे यांच्या याच वक्तव्यावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. यावर आता गिरीश महाजन यांना विचारले असता त्यांनी हात जोडून उत्तर देणे टाळले आहे. ‘निर्मल वारी’ या उपक्रमासाठी पुण्यामध्ये आले असता गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संभाजी भिडे यांनी ‘आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाला आहे ते हंडग आहे’, असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य सध्या चर्चेत असून याबाबत गिरीश महाजन यांना विचारला असता. गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर हात जोडले आणि ‘जय श्रीराम’ म्हणत काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र माध्यमांनी पुन्हा एकदा त्यांना याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी बोलावलं असता त्यांनी ती प्रतिक्रिया देण्यात टाळले आहे.
गिरीश महाजन काय म्हणाले?
‘सालाबादाप्रमाणे वारीला सुरुवात झाली आहे. १७ जुलैला या सर्वच दिंड्या पंढरपुरात जाऊन पोहोचणार आहे. वारी स्वच्छ, सुंदर, निर्मल आणि सुरक्षित होण्यासाठी सरकारने सर्व उपाययोजना केले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी पेक्षा अधिक निधी यावर्षी वारीसाठी सरकारने दिला आहे. गेल्या वर्षी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून २५-३० कोटी निधी खर्च करण्यात आला होता. मात्र यावर्षी 50 कोटी हून अधिक निधी वारीसाठी खर्च करण्यात येत आहे. आरोग्याच्या बाबतीत देखील गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट खर्च यंदा करण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सरकार सर्वोतरुपरी प्रयत्न करत आहे’, असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.
संभाजी भिडे काय म्हणाले?
“आपल्याला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य दळभद्री आणि हंडग स्वातंत्र्य आहे. ते जमत नाही. स्वातंत्र्य म्हणजे हिंदवी स्वातंत्र्य. भगवा झेंडा घेऊन आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला पाहिजे. जिथे जिथे सूर्य उगवतो तिथे तिथे भगवा झेंडा घेऊन हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे” असे वक्तव्य संभाजी भिडेंनी केले आहे.
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडेंनी देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यावेळी शिवप्रतिष्ठान अध्यक्ष संभाजी भिडे यांना आषाढी वारीत सहभागी होण्यावर निर्बंध नसले, तरी त्यांना पुणे पोलिसांनी वारीत सहभागी होण्यापूर्वी नोटीस दिली आहे. पालखी दर्शनावेळी कायदा-सुव्यवस्थेची काळजी घ्यावी, अशी सूचना भिडे यांना देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विठुरायाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांचा टेम्पो उलटला; २० जखमी, नेमका काय प्रकार?
-काकांचा पुतण्याला धक्का; पुण्यातील नगरसेवक करणार ‘शरद पवार गटा’त प्रवेश
-‘लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत…’; ‘सामना’तून अजित पवारांवर ताशेरे
-पुण्यात बनावट पोलिसांकडून नागरिकांना चक्क बंदुकीने मारहाण; व्हायरल व्हिडिओवर नागरिकांचा संताप
-लोणावळ्याला जाणं पडलं महागात! भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील ५ जण गेले वाहून