पुणे : विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा पुण्यात किरकोळ अपघात झाला आहे. वारकऱ्यांना घेऊन निघालेला टेम्पो उलटला असून घटना कात्रज -कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात रविवारी रात्री घडली आहे. अपघातात २० वारकऱ्यांना दुखापत झाली असून, याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
टेम्पोचालक नवनाथ लक्ष्मणराव चाेपडे (रा. धार, जि. परभणी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी प्रयागबाई नारायण बोखारे (वय ७२, रा. फुकटगाव, जि. परभणी) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार प्रयागबाई बोखारे यांचे डोके, हाताला दुखापत झाली, तसेच त्यांचे मनगट फ्रॅक्चर झाले. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वारकऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या उपचार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या परभणी जिल्ह्यातील वारकऱ्यांना घेऊन टेम्पो रविवारी (३० जून) रात्री मुक्कामी निघाला होता. कात्रज–कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात गल्ली क्रमांक १ येथे टेम्पोचालक चोपडे याचे नियंत्रण सुटले. टेम्पो उलटून टेम्पोतील २० वारकऱ्यांना दुखापत झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-काकांचा पुतण्याला धक्का; पुण्यातील नगरसेवक करणार ‘शरद पवार गटा’त प्रवेश
-‘लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत…’; ‘सामना’तून अजित पवारांवर ताशेरे
-पुण्यात बनावट पोलिसांकडून नागरिकांना चक्क बंदुकीने मारहाण; व्हायरल व्हिडिओवर नागरिकांचा संताप
-लोणावळ्याला जाणं पडलं महागात! भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील ५ जण गेले वाहून
-पालखी सोहळ्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या; संभाजी भिडेंना पोलिसांची नोटीस