पुणे : नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचत दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर पुण्यामध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरत मोठा जल्लोष केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वाहतूक नियोजन करणारा बनावट पोलीस नागरिकांना बंदुकीने मारहाण करत असल्याचे दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक बनावट पोलीस गाडीवरील तरुणांना आपल्या हातातील बंदूकीने मारत आहे. त्यामध्ये ती बंदुकही तुटल्याचं पाहायला मिळाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला असून टीकेची झोड उठवली आहे.
व्हायरल झालेला हा बनावट पोलीस असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकरणावर आता पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी दारुच्या नशेत पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. आयपीसी कलम ४२० आणि कलम १७० आणि महाराष्ट्र मद्य कायदा कलम ८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लोणावळ्याला जाणं पडलं महागात! भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील ५ जण गेले वाहून
-पालखी सोहळ्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या; संभाजी भिडेंना पोलिसांची नोटीस
-रिटायरमेंट कधी घ्यावी? शरद पवारांनी सांगितली योग्य वेळ
-रोमांचक सामन्यात भारताचा थरारक विजय; धोनी नंतर रोहितच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा जिंकला टी-20 कप
-पुण्यनगरीत आज ज्ञानेबा-तुकोबांच्या पालख्यांचे होणार मनोमिलन; ‘या’ मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल