पुणे : पुणे शहरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या दाखल होणार आहेत. शिवप्रतिष्ठान धारकरी कार्यकर्त्यांना तुकोबांच्या पालखी समोर चालण्यासाठी पोलिसांनी मनाई केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीसांनी संभाजी भिडे यांच्या ‘शिवप्रतिष्ठान’ला एक नोटीस पाठवली आहे. ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
संभाजी भिडे गुरुजींनी पुण्यातील जेएम रोडवरील जंगली महाराज मंदिरात घेतले दर्शन घेतले. पालखी पुण्यात दाखल झाल्यानंतर भिडे गुरुजी थोड्याच वेळात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होणार आहेत. वारीत सहभागी होण्याआधी भिडे गुरुजी यांनी दरवर्षीप्रमाणे जंगली महाराज मंदिरात दर्शन घेतले.
संभाजी भिडे गुरुजींसोबत वारीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र भरातून शिवप्रतिष्ठानचे धारकरी जंगली महाराज मंदिरात दाखल झाले आहेत. भिडे यांचे कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचे शस्त्र घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाहीत, असे या नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दिंड्यांची शिस्त न मोडता तसेच पालखी सोहळ्यात विलंब होणार नाही याची काळजी घेत शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकतात. तसंच भिडे गुरुजी जर वारकरी म्हणून सहभागी होत असतील तर हरकत नाही, असे आळंदी देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले आहे. यापूर्वी भिडे गुरूजी आणि त्यांच्या समर्थकांनी वारीत शस्त्र आणल्याने आणि तेढ निर्माण करणारी भाषण केली होती, त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. यंदा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याची नोटीस दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-रिटायरमेंट कधी घ्यावी? शरद पवारांनी सांगितली योग्य वेळ
-रोमांचक सामन्यात भारताचा थरारक विजय; धोनी नंतर रोहितच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा जिंकला टी-20 कप
-पुण्यनगरीत आज ज्ञानेबा-तुकोबांच्या पालख्यांचे होणार मनोमिलन; ‘या’ मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल
-‘…तर माझं नाव बदलेन मी’; एक ट्रिलियनच्या मुद्द्यावरुन जयंत पाटलांची विधानसभेत मिश्किल टीका
-पावसाळ्यात आपले स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काय खावे काय टाळावे?