पुणे : पुणे शहरामध्ये आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यनगरीमध्ये आगमन होणार असून या दोन्हा पालख्यांचे मनोमिलन होणार आहे. दोन्ही पालख्या शहरामध्ये येणार असल्यामुळे शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पिंपरी चिंचवड येथून रविवारी दुपारनंतर पुण्यात दाखल होणार आहे. दरम्यान, कोणकोणत्या ठिकाणी वाहतुकीत बदल होणार आहेत.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावरील वाहतूकीत बदल
बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्थानक, मरिआई गेट चौक, कमल नयन बजाज चौक, जुन्या मुंबई – पुणे महामार्गावरील वाकडेवाडीपर्यंतचा रस्ता वाहतूक बंद असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
येरवड्यातील मनोरुग्णालय (मेंटल कॉर्नर) ते आळंदी रस्ता चौक बंद राहणार आहे. तसेच चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता बंद असणार आहे. दरम्यान, नवीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक, होळकर पूल ते साप्रस चौकीपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. या कालावधीत आळंदीकडे जाणारे रस्ते आवश्यकतेनुसार बंद राहतील, बाकी रस्ते सुरू राहतील.
महत्वाच्या बातम्या-
-‘…तर माझं नाव बदलेन मी’; एक ट्रिलियनच्या मुद्द्यावरुन जयंत पाटलांची विधानसभेत मिश्किल टीका
-पावसाळ्यात आपले स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काय खावे काय टाळावे?
-विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; भाजपच्या ‘या’ नेत्यांची विधान परिषदेवर लागणार वर्णी!