पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात विषेशत: भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्व पक्षांकडून करण्यात येत आहे. त्यातच सध्या शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील राज्याच्या विधीमंडळाचे हे शेवटचे अधिवेशन सुरु आहे. अशातच विधान परिषदेचे ११ सदस्य हे पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
जुलैमध्ये राज्यात ११ जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, नीलय नाईक, माधवी नाईक यांच्या नावांची चर्चा आहे. योगेश टिळेकर, अमित गोरखे यांच्या उमेदवारीमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली आहे.
जुलैमध्ये विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विधानसभा सदस्य विधान परिषदेतील ११ आमदारांची निवड करणार आहेत. त्यासाठी, २ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. तर, ५ जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. १२ जुलै रोजी रोजी मतदान होणार असून, १२ जुलै रोजीच निकाला जाहीर होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे ड्रग्ज: शहरातील अनधिकृत पब्ज आणि बारच्या कारवाईवर सौरभ गोखलेची प्रतिक्रिया
-पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार, मोहोळांचा दिल्ली दरबारी पाठपुरावा यशस्वी
-संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; वारकरी विठुनामात तल्लीन
-धक्कादायक! पुण्यातील नामांकित हॉस्पिटलने लपवली झिकाचा रुग्णाची माहिती; पालिकेने घेतली मोठी अॅक्शन
-‘जो जे वांच्छिल तो ते लाहो.’; चंद्रकांत पाटलांचा वारकऱ्यांसाठी संकल्प