पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस ड्रग्जचे प्रमाण वाढत आहे. त्यावरुन सर्व स्तरातून टीकेची झोड उठवली जात आहे. त्यातच शहरातील मध्यवर्ती भागातील एफसी रोडवरील एका बारमध्ये अमली पदार्थांचे सेवन करतानाचा २ तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरुन पुणे पालिकेकडून शहरातील अनधिकृत हॉटेल, बारवर कारवाई सुरु आहे. त्यावरुन आता मराठी अभिनेता सौरभ गौखलेने त्याच्या सोशल मीडियावर पुण्यातील अनधिकृत कारवाईवर भाष्य केले आहे. त्याच्या या मार्मिक पोस्टची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.
सौरभने त्याच्या पोस्टमध्ये सोशल मीडिया पोस्टमध्ये शहरातील अनेक ईल-लीगल पब्स आणि बार्सवर महापालिकेची कारवाई!!! पण हेअनधिकृत बार आणि पब बांधू देऊन इतकी वर्ष ज्यांनी मोकाट चालू दिले त्या जादूगारांचा कौतुक सोहळा कधी? असा सवाल त्याने उपस्थित केला आहे.
पुणे महानगरपालिकेकडून सध्या शहरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील अनधिकृत पब्स आणि बारवर कारवाई करण्यात येत आहे. पुण्यात सलग ४ दिवसांपासून महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत बाणेर, बालेवाडी, हडपसर, कल्याणीनगर, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क इथे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार, मोहोळांचा दिल्ली दरबारी पाठपुरावा यशस्वी
-संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; वारकरी विठुनामात तल्लीन
-धक्कादायक! पुण्यातील नामांकित हॉस्पिटलने लपवली झिकाचा रुग्णाची माहिती; पालिकेने घेतली मोठी अॅक्शन
-‘जो जे वांच्छिल तो ते लाहो.’; चंद्रकांत पाटलांचा वारकऱ्यांसाठी संकल्प
-पुणे ड्रग्ज् पार्टी: पुणे पोलीसांनी आतापर्यंत ३ ड्रग्ज् पेडलर्सला केली अटक