पुणे : पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे नागरी हवाई वाहतूक विभागाची जबाबदारी आल्यानंतर पहिल्याच दिवसापासून त्यांनी पुणे विमानतळाच्या प्रश्नांबाबत विशेष लक्ष घातले. याचाच सकारात्मक परिणाम म्हणजे अवघ्या २ आठवड्यात पुणे विमानतळाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहे. यात धावपट्टी वाढवण्यासाठी शक्यता तपासणी सर्वेक्षणला परवानगी मिळाली तसेच पार्किंग बेवर पार्क केलेले विमान संरक्षण दलाच्या जागेत हलवण्यात आले, या दोन्ही विषयांसदर्भात मोहोळ यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. आणि आता नवे टर्मिनल खुले होण्याचाहीमार्गही मोकळा झाला आहे. या तीनही प्रश्नांचा पाठपुरावा मोहोळ यांनी स्वतः केला होता.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने साकारलेले टर्मिनल लवकरच पुणेकरांसाठी खुले होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारे सीआयएसएफचे मनुष्यबळ गृहविभागाकडून मंजूर करण्यात आले आहे. मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याचे हे यश असून मनुष्यबळासंदर्भात मोहोळ यांनी नुकतीच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.
पुणे विमानतळावरुन होणाऱ्या उड्डाणांची गरज लक्षात घेत मोदी सरकारने नवे टर्मिनल साकारले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याचे उद्घाटनही झाले होते. मात्र सीआयएसएफच्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या टर्मिनलचा प्रत्यक्ष वापर सुरु झाला नव्हता. मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेताच या प्रकरणी लक्ष घालून गृह विभागाकडे पाठपुरावा सुरु केला होता. तसेच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. या प्रयत्नांना यश आले आहे.
Good news for Punekars; new terminal to open soon!
I met the Hon. Home Minister Shri Amit Shah ji to request his intervention in this matter. He approved the additional 222 CISF personnel which were needed for this new terminal.
We are grateful for his timely help. Thank you… pic.twitter.com/O3YkIHVPdn
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 29, 2024
‘नवे टर्मिनल लवकरात लवकर वापरात आणण्यासाठी केलेल्य प्रयत्नांना यश आले असून पुणे विमानतळासाठी २२२ विविध पदांना मंजुरी मिळाली आहे. ही पदे वेगवेगळ्या ७ प्रकारांची आहेत. या नव्या संख्येसह पुणे विमानतळासाठी आता सीआयएसएफच्या मनुष्यबळाची संख्या ७१५ वर गेली आहे. नव्या टर्मिनलसाठी आवश्यक असणारी संख्या आता पूर्ण झाली असून नवे टर्मिनल वापरात आणण्यात आता कोणताही अडथळा उरलेला नाही. त्यामुळे हे टर्मिनल लवकरात लवकर खुले करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मनुष्यबळ पुरवण्याची मागणी गृहविभागकडून मान्य केल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांचे पुणेकरांच्या वतीने धन्यवाद मानतो’, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-धक्कादायक! पुण्यातील नामांकित हॉस्पिटलने लपवली झिकाचा रुग्णाची माहिती; पालिकेने घेतली मोठी अॅक्शन
-‘जो जे वांच्छिल तो ते लाहो.’; चंद्रकांत पाटलांचा वारकऱ्यांसाठी संकल्प
-पुणे ड्रग्ज् पार्टी: पुणे पोलीसांनी आतापर्यंत ३ ड्रग्ज् पेडलर्सला केली अटक
-अनधिकृत पब्स आणि बारवर पुणे महापालिकेची धडक कारवाई; दिवसभरात तब्बल १३ हॉटेलवर हातोडा