पुणे : पुणे शहरामध्ये झिका व्हायरलचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहरात आतापर्यंत ३ झिका व्हायरसची लागण झाल्याचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच आता हडपसर परिसरातील नोबल हॉस्पिटलने या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णाची माहितीच महापालिकेला कळविली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने यावर कोणतीही कठोर कारवाई न करता नोबल हॉस्पिटलला केवळ नोटीस पाठवली आहे. पुण्यातील एरंडवणा परिसरामध्ये झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या १५ वर्षीय मुलीला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर शहरात तिसरा रुग्ण कोंढवा परिसरात आढळला आहे.
मुंढवा येथील ४७ वर्षीय महिलेला ३१ मे रोजी ताप, डोकेदुखी आणि डेंग्यूसदृश लक्षणांच्या तक्रारींसह नोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संसर्गजन्य रोगतज्ज्ञ म्हणून, उपचार करणारे नोबल हाॅस्पिटलचे डॉ. अमित द्रविड यांनी या रुग्णाला डेंगी, चिकुनगुनिया आणि झिका यासाठी चाचण्या करण्याचे सुचविले. यावेळी संबंधित रुग्णाची झिकाची चाचणी पॉझिटिव्ह आली.
शहरामध्ये ३ रुग्ण सापडले तरीही नोबल हॉस्पिटलने पुणे महापालिकेला याबाबतची माहिती कळवली नसल्याने पालिकेने नोबल हॉस्पिटलच्या निष्काळजी वर्तनाबद्दल नोटीस पाठवली आहे. नोबल हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल झाल्यावर ३१ मे रोजीच या प्रकरणाची माहिती देणे आवश्यक होते. त्यामुळे प्रसार रोखणे शक्य झाले असते. या प्रकरणामुळे नोबल हॉस्पिटलचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘जो जे वांच्छिल तो ते लाहो.’; चंद्रकांत पाटलांचा वारकऱ्यांसाठी संकल्प
-पुणे ड्रग्ज् पार्टी: पुणे पोलीसांनी आतापर्यंत ३ ड्रग्ज् पेडलर्सला केली अटक
-अनधिकृत पब्स आणि बारवर पुणे महापालिकेची धडक कारवाई; दिवसभरात तब्बल १३ हॉटेलवर हातोडा
-‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’वरुन उद्धव ठाकरेंचा टोला; म्हणाले, ‘लेकींची काळजी घेताय पण,…’
-‘राज्य सरकारवर ७ लाख कोटींचे कर्ज ते कर्ज फेडायला पैसा नाही, अन्…’; एकनाथ खडसेंचा सवाल