पुणे : वारी आणि वारकरी हा अत्यंतिक जिव्हाळ्याच्या विषय आहे. त्यामुळे वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या उत्तमोत्तम सोईसुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. वारकऱ्यांसाठी काम करताना श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानामधील ‘जो जे वांच्छिल तो ते लाहो’, हा संकल्प असल्याची भावना राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून बुधवारी कोथरुडमध्ये संतपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय भक्तीमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक वारीतील प्रमुखांचे पाद्यपूजन करुन, आशीर्वाद घेतले. तसेच, वारीसाठी आवश्यक टाळ, मृदंग, तंबू आदी पारमार्थिक साहित्याचे वाटप केले.
वारकरी बांधवांना वारी दरम्यान उत्तमोत्तम सोईसुविधा मिळाव्यात यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यासोबतच ज्या वारकरी बांधवांना आपला उत्तरकाळ भगवंताच्या चरणी, हरिनामात व्यतित करण्याची इच्छा आहे, अशा वारकरी बांधवांसाठी लोकसहभागातून श्री क्षेत्र देहू येथे वारकरी भवन उभारण्यात येणार आहे. त्याचेही काम सुरू झाले आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथेही अशी सुविधा उभारण्याची इच्छा अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केली असून, त्यासाठी ही प्रयत्न करत आहे.
‘आज चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांची सेवा हे कर्तव्य मानून “संतपुजन व वारकरी मंडळांना विशेष वारीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप आज होत आहे. महाराष्ट्रास वारकरी संप्रदायाचा थोर वारसा असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो’, असे संयोजक गिरीश खत्री म्हणाले आहेत. यावेळी हरी भक्त परायण श्री. चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या किर्तन सेवेत उपस्थित सर्वच भक्तीमय झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे यांनी केले.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे ड्रग्ज् पार्टी: पुणे पोलीसांनी आतापर्यंत ३ ड्रग्ज् पेडलर्सला केली अटक
-अनधिकृत पब्स आणि बारवर पुणे महापालिकेची धडक कारवाई; दिवसभरात तब्बल १३ हॉटेलवर हातोडा
-‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’वरुन उद्धव ठाकरेंचा टोला; म्हणाले, ‘लेकींची काळजी घेताय पण,…’
-‘राज्य सरकारवर ७ लाख कोटींचे कर्ज ते कर्ज फेडायला पैसा नाही, अन्…’; एकनाथ खडसेंचा सवाल
-अजित पवारांची मोठी घोषणा; राज्यात ‘या’ ३ जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी