पुणे : पुणे शहरामध्ये कल्याणीनगर अपघात, आणि नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ४ तरुणांचे ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडीओ या प्रकरणांनतर शहरातील पब, बार आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यासाठी पुणे महापालिका तसेच पुणे पोलीस सज्ज झाले आहेत. एफ सी रस्त्यावरील ‘लिक्विड लिझर लाउंज’ बारमध्ये ड्रग्ज पार्टी झाल्याचे समोर आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील ड्रग्ज प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महानगर पालिकेला हॉटेल पब, रेस्टॉरंट, बारच्या बेकायदा बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता पोलिसांच्या मदतीने महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून हॉटेल पब, रेस्टॉरंट, बारच्या बेकायदा बांधकाम पाडण्याचे काम सुरु केले आहे.
एफ सी रस्त्यासह शहरातील तब्बल २६ ठिकाणांवरील पब, बार, रेस्टॉरंटवर धकड कारवाई केली असून आज दिवसभरात तब्बल १३ हॉटेल्सवर पुणे महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईध्यये एकूण ६४ हजार ५४५ चौरस फूट इतके बांधकाम पाडण्यात आले आहे. पुण्यातील हडपसर भागातील उंद्री आणि मोहम्मदवाडी परिसरातील पब्स आणि बारवर पुणे महानगरपालिकेने कारवाई केली आहे. बार, बेकरी, माऊंटन हाय, गार्लीक हॉटेलसह इतर हॉटेलचे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’वरुन उद्धव ठाकरेंचा टोला; म्हणाले, ‘लेकींची काळजी घेताय पण,…’
-‘राज्य सरकारवर ७ लाख कोटींचे कर्ज ते कर्ज फेडायला पैसा नाही, अन्…’; एकनाथ खडसेंचा सवाल
-अजित पवारांची मोठी घोषणा; राज्यात ‘या’ ३ जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी