Maharashtra Budget Session : महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेश सध्या सुरु असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. त्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक विविध तरतुदी करण्यात आल्या असून राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ जाहीर केली आहे. त्यावरुन आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे शुक्रवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
राज्य सरकार महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’ आणत असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे. पण, लेकींची काळजी करताना लेकाची काळजीही करावी. त्यासाठी सरकारने ‘लाडका भाऊ’ किंवा ‘लाडका पुत्र’ अशी योजनादेखील सुरू करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींशी संवाद साधला. pic.twitter.com/tbXdrK5l6V
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 28, 2024
महाराष्ट्र लुटणाऱ्याला जनता कधी माफ करणार नाही. सरकारने लाडकी बहीण योजना आणली, आम्हाला आनंद आहे. परंतु, महिलांसाठी योजना आणल्यानंतरही आजसुद्धा लोंढेच्या लोंढे नोकरीच्या शोधत फिरत आहेत. लेकींची काळजी घेत आहेत, लेकांची काळजी यात नाही, त्यामुळे, ‘लाडका पुत्र ही देखील योजना’ त्यांनी आणावी, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे.
जनतेने लोकसभेला जो दणका दिला त्यानंतर राज्य सरकारने हे बजेट समोर ठेवलं आहे, पण जनता यांच्या भुलथापाला बळी पडणार नाही. काहीतरी धुळफेक करायची, जनतेला लुबाडायचं काम हे सरकार करत आहे. थापांचा महापूर, आश्वासनाची अतिवृष्टी म्हणजे आजचा अर्थसंकल्प आहे. देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत बोलायचं झालं तर खोटं नेरेटिव्ह पसरवण्याचे काम या बजेटमधून केले आहे, अशी देखील टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘राज्य सरकारवर ७ लाख कोटींचे कर्ज ते कर्ज फेडायला पैसा नाही, अन्…’; एकनाथ खडसेंचा सवाल
-अजित पवारांची मोठी घोषणा; राज्यात ‘या’ ३ जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी
-लक्ष्मण हाकेंची ‘अभिवादन यात्रा’ स्थगितीवर प्रतिक्रिया; म्हणाले, ‘माझ्या भागामध्ये येऊन…’