Maharashtra Budget Session : महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेश सध्या सुरु असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. त्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक विविध तरतुदी करण्यात आल्या असून सर्वसामान्यांना अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यावरुन आता विरोधकांना टीका करण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.
“हा अर्थसंकल्प निवडणुका समोर ठेऊन सादर केलेला आहे. वेगवेगळ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या. घोषणा चांगल्या आहेत. मात्र आता वेळ नाही. सध्या राज्य सरकारवर ७ लाख कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही तर नवीन योजनांसाठी पैसे कुठून आणणार?” अशी टीका एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये घरवापसी करण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र अद्यापही एकनाथ खडसे हे भाजपमध्ये पुन्हा गेले नसून एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांची मोठी घोषणा; राज्यात ‘या’ ३ जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी
-लक्ष्मण हाकेंची ‘अभिवादन यात्रा’ स्थगितीवर प्रतिक्रिया; म्हणाले, ‘माझ्या भागामध्ये येऊन…’
-‘अजित पवार गटाच्या २२ आमदारांनी शरद पवारांशी संपर्क साधला, पण…’; रोहित पवारांचा गौप्यस्फोट