Budget Session : आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीकडून जोरदार तयारी आजच्या अर्थसंकल्पातून पहायला मिळत आहे. त्यामुळे आज जाहीर होत असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. राज्याचे वित्तमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक तरतुदी केल्या आहेत.
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी पूर्ण केली त्यावरुन विरोधकांकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली जाते. महागाईच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात महायुती सरकारला तर केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठत आहे.
ग्राहकांना पेट्रोलमध्ये प्रति लिटर 65 पैसे, तर डिझेलमध्ये प्रति लिटर 2.7 पैसे रुपये कमी होणार आहेत. नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिक व प्रवाशांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आता सवलत मिळणार आहे. कारण, राज्य सरकारच्या निर्णयामुळे या तिन्ही जिल्ह्याच्या क्षेत्रात पेट्रोल व डिझेलचे दर कमी होणार आहेत.
अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेल वरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. या अर्थसंकल्पात पाच केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करातून सूट, मुद्रांक शुल्क दंडात कपात, मुद्रांक शुल्क परतावा आदी माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लक्ष्मण हाकेंची ‘अभिवादन यात्रा’ स्थगितीवर प्रतिक्रिया; म्हणाले, ‘माझ्या भागामध्ये येऊन…’
-‘अजित पवार गटाच्या २२ आमदारांनी शरद पवारांशी संपर्क साधला, पण…’; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
-‘…अन् ते ऐकून मी कपाळावर हात मारला’; अजित पवारांनी सुरेश धस यांच्याबाबत असं काय सांगितलं?