मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या लग्नाबाबतचा गमतीशीर प्रसंग सांगितला आणि उपस्थितांमध्ये चांगलीच हशा पिकल्याचे पहायला मिळाले. राज्यातील विधान परिषदेच्या ४ जागांसाठी मतदान झाले होते. विधान परिषदेतील ४ सदस्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवारांनी धस यांच्याबाबतचा संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि सुरेश धस राज्यमंत्री होते तेव्हाचा किस्सा सांगितला आहे.
“मी देवगिरी बंगल्यावर असताना सुरेश धस त्यांच्या आईला आणि इतर काही लोकांना घेऊन माझ्याकडे आले आणि त्यांनी मला एक परवानगी मागितली. मी विचारलं, मला कसली परवानगी मागताय? तर ते म्हणाले, आईलाही बरोबर घेऊन आलोय. त्यानंतर त्यांनी कसली परवानगी मागितली असेल…? त्यांनी थेट दुसरं लग्न करण्याची परवानगी मागितली. मी ते ऐकून कपाळावर हात मारला. त्यांनी त्यांच्या आईला बाजूलाच बसवलंय आणि म्हणतात… आईची पण सहमती आहे, आता तुम्ही परवानगी द्या. त्यावर, मी त्यांना म्हटलं, अहो सुरेशराव काय चाललंय काय?”, असा किस्सा अजित पवारांनी सांगताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकल्याचे पहायला मिळाले.
अजित पवारांनी सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाबाबतचा हा किस्सा सांगून अजित पवार म्हणाले, “कधी कोणाच्या मनात काय येईल हे सांगता येत नाही.”
महत्वाच्या बातम्या-
-‘हमाल, कष्टकरी माथाडी कायद्याची अंमलबजावणी करा, अन्यथा…’; बाबा आढावांचा राज्य सरकारला इशारा
-पुण्यात पालखी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज; ५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात
-‘अजित पवारांनी अन्याय केला की नाही? हे सगळ्यांना माहिती आहे, इंदापूरच्या जागेचा….’- हर्षवर्धन पाटील
-‘तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो’; अंधारे- देसाईंचा वाद काही थांबेना
-‘आम्ही अजितदादांसाठी सत्ता आणायची का? त्यांना महायुतीतून बाहेर काढा’; भाजप कार्यकर्त्यांची खदखद