पुणे : मापाडी महामंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. ‘हमाल, कष्टकरी माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. अन्यथा राज्यभरातील कष्टकऱ्यांकडून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार’, असा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला आहे.
मुंबईत ४ महिन्यापूर्वी केलेल्या बेमुदत उपोषणावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. माथाडी कायद्याची राज्यात अंमलबजावणी न झाल्याने राज्यातील हमाल कष्टकऱ्यांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल. सरकारने परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असेही डाॅ. आढाव म्हणाले आहे.
महामंडळाच्या बैठकीला महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे, उपाध्यक्ष राजकुमार घायाळ, विकास मगदूम, सहचिटणीस अप्पा खताळ, हनुमंत बहिरट, शिवाजी शिंदे, संतोष नांगरे, गोरख मेंगडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात पालखी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज; ५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात
-‘अजित पवारांनी अन्याय केला की नाही? हे सगळ्यांना माहिती आहे, इंदापूरच्या जागेचा….’- हर्षवर्धन पाटील
-‘तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो’; अंधारे- देसाईंचा वाद काही थांबेना
-‘आम्ही अजितदादांसाठी सत्ता आणायची का? त्यांना महायुतीतून बाहेर काढा’; भाजप कार्यकर्त्यांची खदखद