पुणे : आषाढी वारी सोहळा संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी पुणे शहरामध्ये ३० जून या दिवशी रविवारी दाखल होणार आहे. श्री क्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी (२८ जून) प्रस्थान होणार आहे तर श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे शनिवारी (२९ जून) प्रस्थान होणार आहे. रविवारी (३० जून) पालखी सोहळा शहरात दाखल होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी, भाविकांची मोठी गर्दी होत असते.
अनेक भाविक या वारीमध्ये पायी चालण्यासाठी सहभागी होतात. पालखी आगमन, मुक्काम, प्रस्थान सोहळा विचारात घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. तब्बल ५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
संपूर्ण पालखी सोहळ्यावर पोलिसांची नजर असणार आहे. यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार असून अनेक भागात मनोरे उभारण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यातील गर्दीत चोरटे भाविकांकडील मौल्यवान ऐवज चोरतात. सोनसाखळी चोरी, मोबाइल चोरी सारखे प्रकार देखील घडतात. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी गुन्हे शाखेची पोलिसांची पथके साध्या वेशात गस्त घालणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘अजित पवारांनी अन्याय केला की नाही? हे सगळ्यांना माहिती आहे, इंदापूरच्या जागेचा….’- हर्षवर्धन पाटील
-‘तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो’; अंधारे- देसाईंचा वाद काही थांबेना
-‘आम्ही अजितदादांसाठी सत्ता आणायची का? त्यांना महायुतीतून बाहेर काढा’; भाजप कार्यकर्त्यांची खदखद
-पुणेकरांनो सावधान! डासांपासून सावध रहा; शहरात सापडला झिकाचा तिसरा रुग्ण