पुणे : शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील शेवटच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली आहे. १४ व्या विधानसभेचे शेवटचे अधिवेशन असून विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने हे अधिवेशन अधिक विशेष आहे. सकाळी अधिवेशनाला सुरवात झाली. राज्यातील ८ आमदारांनी राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष संजय नार्वेकर यांनी राजीनामा दिलेल्या आमदारांची नावे वाचून दाखवली आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या ८ आमदारांनी आणि राजू पारवे यांनी देखील विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने त्यांना विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिलेल्यांपैकी निलेश लंके, प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांच्यासह इतर आमदारांचा समावेश आहे. राजू पारवे यांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन, लोकसभा निवडणूक लढवली होती.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनात सरकारकडून अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होत आहे. तर २८ जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राजू पारवे- उमरेड विधानसभा (राजीनामा – 24 मार्च), निलेश लंके- पारनेर विधानसभा (राजीनामा – १० एप्रिल), प्रणिती शिंदे – सोलापूर शहर मध्य विधानसभा, बळवंत वानखेडे – दर्यापूर विधानसभा, प्रतिभा धानोरकर – वरोरा विधानसभा (१३ जून), संदीपान भुमरे – पैठण विधानसभा (१४ जून), रविंद्र वायकर – जोगेश्वरी पूर्व विधानसभा, वर्षा गायकवाड- धारावी विधानसभा या आमदारांनी राजीनामा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘महायुतीत खडकवासल्याची जागा शिवसेनेला हवी’, शिंदेंच्या शिलेदाराने थोपटले दंड; नेमकं गणित काय?
-पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सवाचा आनंद होणार द्वीगुणीत, स्वारगेटपर्यंत मेट्रो धावणार!
-‘अंत पाहू नका, सुरुवातीला हात जोडू पण संयम तुटला तर…’; पोलीस आयुक्तांचा सज्जड दम