पुणे : पुणे शहरातील म्हात्रे पूल, राजाराम पुलाच्या दरम्यान नदीपात्रात हरित पट्ट्यात जागा मालकांनी बेकायदा बांधकाम केले होते. त्याविरोधात महापालिकेने कारवाई केल्याने जागा मालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. दाखल केलेली याचिका उच्च न्यान्यायलयाने बुधवारी (दि.२६) फेटाळून लावली असून निकाल महापालिकेच्या बाजूने दिला आहे.
हरित पट्ट्यात केले बांधकाम नियमित करण्यासारखे नसल्याचेही निरीक्षण नोंदवले आहे. या निकालानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कोणत्याही क्षणी कारवाई केली जाणार आहे. तसेच आता पुणे महापालिकेच्या वतीने मागील डिसेंबरमध्ये थांबविण्यात आलेल्या कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.
डी.पी. रोडच्या लगत असलेल्या हरित पट्टयामध्ये नियमांचे उल्लंघन करून मोठी हॉटेल उभारण्यात आले आहेत. मोठे शेड उभारुन याठिकाणी मंगल कार्यालयाचा व्यावसाय केला जात आहे. मात्र या पट्ट्यात केलेले बांधकाम हे बेकायदा आहे. या जागेमध्ये पुणे महापालिकेकडून कोणतीही परवानगी देण्यात आली नसतानाही हे व्यावसाय सुरु होते. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून सातत्याने नोटीसा दिल्या होत्या. तसेच अनेकदा कारवाई देखील करण्यात आली होती.
दरम्यान, या भागात असणाऱ्या हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि अन्य आस्थापनांविरोधात काही पर्यावरण प्रेमींनी देखील न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल पर्यावरण प्रेमींच्या बाजूने लागला. त्यानंतर पालिका प्रशासनाने येथील मंगल कार्यालये आणि हॉटेल्सची बांधकामे पाडण्यास सुरूवात केली. २०२३च्या डिसेंबरमध्ये करण्यात आलेल्या या कारवाई विरोधात येथील काही व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका एम.एस. सोनक आणि कमला खाटा यांच्या खंडपीठाने फेटाळून लावताना महापालिकेच्या कारवाईचे समर्थन केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सवाचा आनंद होणार द्वीगुणीत, स्वारगेटपर्यंत मेट्रो धावणार!
-‘अंत पाहू नका, सुरुवातीला हात जोडू पण संयम तुटला तर…’; पोलीस आयुक्तांचा सज्जड दम
-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचा साधेपणा; सुरक्षा जवानांना ‘सॅल्यूट’ला नकार
-‘…म्हणजे विधानसभेसाठी शरद पवारांकडे उमेदवार नाहीत’; अजित पवार गटाची टीका