श्री स्वामी समर्थ : या जगतामधील सर्व माणसांचे जीवन बदलणारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश आपल्याला नेहमीच प्रेरणादायी ठरतात. स्वामी समर्थांचे विचार जो व्यक्ती आपल्या आचरणामध्ये आणतो त्याला त्याच्या आयुष्यात बदल नक्कीच दिसून येतो. त्याच्या आयुष्यातील समस्यांचे निराकारण होते. स्वामी समर्थ महाराज हे सर्वांचे दु:ख दूर करणारे आहेत.
स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या उपदेशामध्ये सुखी संसारासाठी पती व पत्नीसाठी काय उपदेश दिले आहेत हे आज आपण पाहणार आहोत. स्वामींनी सांगितलेल्या उपदेशांचे आचरण केल्याने तुमच्या संसारात सदैव गोडी राहिल आणि संसार सुखाचा होईल.
श्री स्वामा समर्थ महाराजांचे आजचे उपदेश
- काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं. पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं’
- जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा.
- जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात ,तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात.
- ‘मी’पणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही, दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला. अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की.
- संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्वकाही चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो. म्हणूनच ‘त्याग करा आत्मानंद मिळेल.
श्री स्वामी महाराजांनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगले राहते. श्री स्वामींच्या ‘या’ विचारांचे आचरण केल्याने तुमचे जीवन नक्कीच आनंददायी होईल.
महत्वाच्या बातम्या-
-‘अंत पाहू नका, सुरुवातीला हात जोडू पण संयम तुटला तर…’; पोलीस आयुक्तांचा सज्जड दम
-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचा साधेपणा; सुरक्षा जवानांना ‘सॅल्यूट’ला नकार
-‘…म्हणजे विधानसभेसाठी शरद पवारांकडे उमेदवार नाहीत’; अजित पवार गटाची टीका
-लोकसभेला पाठिंबा विधानसभेला ‘एकला चलो रे!’ पुण्यात मनसेची स्वबळाची चाचपणी; सर्व्हेही सुरू