पुणे : पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून सध्या ते दिल्ली येथे आहेत. पुण्याचे मोहोळ दिल्लीत गेले असले तरीही त्यांच्या वागण्यातला साधेपणा आजही दिसून येतो. त्यांच्या साधेपणा प्रशासन आणि सुरक्षा जवानांना अनुभवयला मिळाला आहे. मुरलीधर मोहोळ यांनी सॅल्यूट करणाऱ्या ‘मला सॅल्यूट वगैरे करू नका, नमस्कार केला नाही तरी चालेल!’ असे मोहोळ म्हणाले. त्यांच्या या साधेपणा आणि आपुलकीने मोहोळांनी त्यांची मने जिंकली आहेत.
‘कोणताही सुरक्षा जवान अथवा अधिकारी यापुढे मला ‘जय हिंद’ करणार नाही. तुम्ही तुमची कर्तव्ये पार पाडायलाच हवीत. मात्र, मानसन्मान माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. महत्त्वाचे आहे ते कर्तव्य. यापुढे कोणीही मला ‘जय हिंद’ म्हणजे सॅल्यूट करण्यासाठी हात उंचावू नका. मला नमस्कार नाही केला, तरी चालेल’, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत. हे सांगण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र सदनात सॅल्यूट करणाऱ्या सुरक्षा जवानांना एकत्र बोलावले होते.
पुण्याचे खासदार म्हणून निवडून गेलेले मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात पहिल्याच प्रयत्नात राज्यमंत्रिपदाची माळ पडली व सहकार आणि नागरी हवाई वाहतूक खात्यांचा कार्यभार ते सांभाळत आहेत. मात्र, साधेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या मोहोळ यांना मंत्रिपदामुळे सुरक्षा यंत्रणांकडून सतत मिळत असलेल्या शिष्टाचाराला सामोरे जावे लागत आहे. सुरक्षा जवानांकडून पदोपदी सॅल्यूट केला जात असल्याने अखेर बुधवारी मोहोळ यांनीच महाराष्ट्र सदनातील जवानांना सर्वप्रथम प्रेमळ शब्दांत सल्ला दिला.
महत्वाच्या बातम्या-
-‘…म्हणजे विधानसभेसाठी शरद पवारांकडे उमेदवार नाहीत’; अजित पवार गटाची टीका
-लोकसभेला पाठिंबा विधानसभेला ‘एकला चलो रे!’ पुण्यात मनसेची स्वबळाची चाचपणी; सर्व्हेही सुरू
-शिंदे-फडणवीस सरकारचं शेवटचं अधिवेशन फडणवीसांना पडणार भारी; पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन ठाकरे गट घेरणार
-पुण्यातील फक्त २३ पब अन् बारला परवानगी; त्यातील १ रद्दही झालाय, वाचा नेमका काय प्रकार