पुणे : मान्सूनच्या हजेरीमुळे परिसरामध्ये अनेक विषाणूंचा फैलाव होतो आणि गंभीर आजारांना आमंत्रण मिळते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होते आणि डेंग्यू मलेरियासांरखे आजार पसरतात. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये मंगळवार पेठेमधील सदाआनंद नगरमध्ये २० संशयित रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता शहरात नव्या आजाराने डोके वर काढले आहे.
पुणे शहरामध्ये झिका या व्हायरसचे २ रुग्ण आढळून आले आहेत. ऐन वारीच्या तोंडावर शहरामध्ये झिका व्हायरसचे रुग्ण आढळले असून शहरातील कोथरूडच्या एरंडवणे भागातील एका ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या १३ वर्षीय मुलीमधे झीकाची लक्षणे आढळली आहेत. ताप आणि अंगदुखी अशी ही लक्षणे आहेत. त्यामुळे काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डासांच्या उत्पत्तीमुळे व्हायरस पसरतो. गरोदर महिलांना या व्हायरसचा जास्त धोका आहे.
गरोदर महिलांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले आहे .झिका विषाणू जीवघेणा नसला तरी महिलांवर त्याचा मोठा फटका बसू शकतो. सध्या स्थितीला हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. झिका विषाणू असलेल्या व्यक्तीला डास चावून दुसऱ्या व्यक्तीला चावला तर त्याला झिकाची लागण होते. या विषाणूचा धोका महिलांसाठी जास्त आहे. तुम्हाला डायबिटीज, हायपरटेंशन, इम्युनिटी डिसऑर्डरसारख्या समस्या असतील तर प्रवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात डेंग्यू रुग्णसंख्या वाढली; पालिका प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपायोजना
-‘मी बारामतीची जबाबदारी दुसऱ्यांवर दिली होती, पण…’; शरद पवारांचा अजितदादांना अप्रत्यक्ष टोला
-वारकऱ्यांना सर्व सोईसुविधा द्या, हेमंत रासनेंची पालिककडे आग्रही मागणी; शिष्टमंडळासह घेतली भेट
-‘लोकसभेत आम्हाला एकही जागा नाही, आता….’ विधानसभेच्या किती जागांवर आठवलेंनी केला दावा?
-महायुतीत वाद? रुपाली ठोंबरे म्हणाल्या, ‘अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपला नाही तर…’