पुणे : शहरात पोर्शे कार अपघातामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. त्यातच काल मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे. तसेच अल्पवयीन आरोपीचे आई-वडिल विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल हे अद्यापही जेलमध्ये आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर मृत पावलेल्या तरुणाच्या आईने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
या अपघातामध्ये २ तरुणांचा मृत्यू झाला. अल्पवयीन आरोपीला आत्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मृत अनिश अवधिया याची आई न्यायालयाच्या निर्णयावर नाराज आहे. ‘न्यायाधीश आणि संपूर्ण यंत्रणा अल्पवयीन आरोपीच्या वेदना पाहू शकते, पण आमची वेदना का दिसत नाही?’ असा सवालअनिसच्या आईने विचारला आहे.
कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात मृत पावलेला अनिश हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. तरण्याताठ्या मुलाच्या मृत्यूने त्याची आई खचून गेली आहे. त्यातच न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्ही खूप निराश झालो आहोत. त्या अल्पवयीन आरोपीला फाशी व्हावी, अशी काही आमची इच्छा नाही. पण त्याला शिक्षा तर मिळालीच पाहिजे, की तो पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही, असेही अनिशची आई म्हणाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दादा, विधान परिषदेची एक जागा पुण्याला हवीच! शहर पदाधिकाऱ्यांची अजित पवारांकडे आग्रही मागणी
-Drugs Party: ड्रग्ज घेणाऱ्या ‘त्या’ दोघांची ओळख पटली; एक आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
-पोर्शे कार अपघातातील आरोपीला जामीन तर मृतांच्या पालकांना १० लाख रुपयांची मदत
-व्हायरल व्हिडीओनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; एफसी रोडवरील ‘त्या’ बारचे लायसन्स रद्द
-चहा, कॉफीचे शौकीन आहात? तुम्हाला चहा, कॉफी पिल्याने होणारे ‘हे’ तोटे माहिती आहेत का?