पुणे : पुणे शहरामध्ये कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघाताबाबत महत्वाची बातमी आता समोर आली आहे. अपघातामधील मुख्य अल्पवयीन आरोपी मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे. जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणे बेकायदेशीर असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे देखील निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. मुलाची आत्या पूजा जैन हिने हेबियस कॉर्पसअंतर्गत दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. अल्पवयीन आरोपीला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश हायकोर्टने जारी केले आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
कल्याणीनगर अपघात घटनेत बाईकवर असलेल्या तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. या दोघांच्या आई-वडिलांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी संबंधित घटनेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यानंतर आज हायकोर्टाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे या आरोपी तरुणाची बालसुधारगृहातून सुटका होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणावरुन धंगेकरांची आक्रमक प्रतिक्रिया; म्हणाले, ‘पोलिसांवर कारवाई म्हणजे..’
-‘पुणे शहर भयमुक्त करा, जमत नसेल तर पायउतार व्हा’; राष्ट्रवादीचा शरद पवार गटाची आक्रमक भूमिका
-केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांच्या प्रयत्नानंतर पुणे विमानतळाचा प्रश्न लागला मार्गी
-Pune Drugs Party: शहरातील पब्जवर जिल्हाधिकाऱ्यांची असणार करडी नजर
-‘हे घरात यायची वाट पाहणार का?’ पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन पिट्याभाईची आणखी एक आक्रमक पोस्ट