पुणे : पुणे विमानतळाचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्नाबाबत नवनिर्वाचित केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी केली होती. पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासंदर्भात आता मंजुरी मिळाली आहे. पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक असलेल्या ऑबस्टॅकल लिमिटेशन सरफेसेस (ओएलएस) सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाने सोमवारी मंजुरी दिली.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे ओएलएस सर्वेक्षणाची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली आणि पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत सोमवारी झाली. या बैठकीत संरक्षण मंत्रालयाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून ओएलएस सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला.
पुणे विमानतळाची सध्याची धावपट्टी हवाई दलाच्या मालकीची असल्याने हा विषय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाची मंजुरी यासाठी आवश्यक होती. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निर्णयामुळे आता पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराला गती मिळाली आहे. विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार झाल्यानंतर पुण्यातून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Drugs Party: शहरातील पब्जवर जिल्हाधिकाऱ्यांची असणार करडी नजर
-‘हे घरात यायची वाट पाहणार का?’ पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन पिट्याभाईची आणखी एक आक्रमक पोस्ट
-अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष: जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची वेळ
-पुणे ड्रग्जच्या विळख्यात; ड्रग्ज सेवन करणाऱ्या २ तरुणींचा व्हिडिओ व्हायरल