पुणे : पुणे शहरामधील ड्रग्जचे प्रकरण वारंवार समोर येत असल्याने पुण्यनगरी आहे की ड्रग्ज नगरी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच आता गेल्या २ दिवसांत २ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संतापाची लाट उसळत आहे. सर्व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरातील पब्सवर आता जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार आहेत.
शहरामध्ये ड्रग्ज खरेदी विक्री अद्यापही सुरु असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांना हे प्रकरण चांगलेच भोवले आहे. पुण्यातील पार्टी प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक व्ही. बी. बोबडे यांना निलंबित करण्यात आले आहे. पब्ज, ड्रग्ज प्रकरणावरुन पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
पोर्शे कार अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शहरामध्ये नविन नियमावलीची गरज असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतरही शहरामध्ये असे प्रकार समोर येत असून जिल्हाधिकारी सुत्रे हातात घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असे सांगिण्यात येत आहे की, आम्ही अधिक कडक पाऊले उचलू असे सांगितले जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आधी शहरातील अनेक पब्ज, बार, हॉटेल्सना परवानग्या देण्यात आल्यामुळे आज पुणे शहरामध्ये ड्रग्जचे जाळे वाढत आहे. शहरामध्ये देशातील सर्वात मोठे ड्रग्ज प्रकरण उघडकीस आले होते, त्यानंतर पोर्शे कार अपघातामुळे देखील हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले होते मात्र, गेल्या २ दिवसांमध्ये समोर आलेल्या व्हिडीओवरुन शहरामध्ये ड्रग्ज प्रकरण सुरु असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘हे घरात यायची वाट पाहणार का?’ पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन पिट्याभाईची आणखी एक आक्रमक पोस्ट
-अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष: जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची वेळ
-पुणे ड्रग्जच्या विळख्यात; ड्रग्ज सेवन करणाऱ्या २ तरुणींचा व्हिडिओ व्हायरल
-Pune Drugs Party: पुण्याची संस्कृती टिकवण्यासाठी मेधा कुलकर्णींनी पोलिसांना दिले ‘हे’ आदेश