पुणे : पुणे शहरामध्ये ड्रग्जचे प्रमाण वाढत चालले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या एफसी रोडवरील द लिक्वीज लिझर लाऊंज या हॉटेलमधील ड्रग्ज सेवन करतानाचा २ तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाला त्यानंतर पुणे-नगर रोडवरील एका मॉलमधील वॉशरुमधला देखील २ तरुणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या संपूर्ण प्रकरणावर सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली आहे. त्यातच मराठी अभिनेता रमेश परदेशी यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावरुन सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
व्यसन, ड्रग्स आधी शहराच्या वेशीवर होते मग टेकड्या आणि आता मध्यवस्तीत आलय. घरापर्यंत किंवा घरात यायची वाट पाहणार का? आपण पुणेकर म्हणुन काही करणार की नाही. मी तर करणार…तुम्ही?, असे म्हणत पिट्या भाई म्हणजेच अभिनेता रमेश परदेशी यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
रमेश परदेशी यांनी यापूर्वी देखील शहराच्या टेकडीवर ड्रग्ज दारुच्या नशेत बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या मुलींचा लाईव्ह व्हिडीओ केला होता. पुण्यातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याचा आरोपही रमेश परदेशींनी केला होता. तसेच त्यानंतर शहरामध्ये अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कारच्या भरधाव वेगाने दोघांना चिरडले. त्यानंतर आता ड्रग्ज घेतानाचे हे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या सर्व प्रकरणावरुन रमेश परदेशी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली असून ‘घरापर्यंत किंवा घरात यायची वाट पाहणार का? आपण पुणेकर म्हणुन काही करणार की नाही. मी तर करणार… तुम्ही? प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यावर अवलंबून न राहता एक पालक नागरिक म्हणून पुढची पिढी बरबाद होऊ नये म्हणून काही करणार आहोत का? असा प्रश्न पिट्याभाईने पुणेकरांना विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष: जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची वेळ
-पुणे ड्रग्जच्या विळख्यात; ड्रग्ज सेवन करणाऱ्या २ तरुणींचा व्हिडिओ व्हायरल
-Pune Drugs Party: पुण्याची संस्कृती टिकवण्यासाठी मेधा कुलकर्णींनी पोलिसांना दिले ‘हे’ आदेश