अंगारकी संकष्ट चतुर्थी : आज संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी आली असल्याने आजची संकष्टी चतुर्थी ही ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’ म्हणूनही साजरी होणार आहे. प्रत्येक महिन्यात दर १५ दिवसांनी चतुर्थी योग येत असतात. शुक्ल पक्षावर पडणार्या चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणतात.
पंधरवड्यातून येणाऱ्या चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहेत. आजची अंगारकी संकष्टी चतुर्थी ही खूप विशेष मानली जाते. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची मोठी परंपरा आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते. या चतुर्थी तिथीला ‘संकटहर चतुर्थी’ असेही म्हणतात. या दिवशी श्रीगणेशाची विधीवत पूजा आणि दर्शन करणे खूप भाग्याचे मानले जाते.
‘संकष्टी चतुर्थी’ या नावावरूनच संकट दूर करणारी तिथी असल्याचे समजते. ‘संकष्टी चतुर्थीचे हे व्रत केल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणी दूर होतात, जीवनात सुख-शांती येते. हे व्रत पाळणाऱ्याला चांगली बुद्धी आणि जीवनात सुख प्राप्त होते. संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला खूप मान्यता दिली जाते, तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात.
अंगारकरी चतुर्थीचा शुभ मुहूर्त
कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी २५ जून रोजी पहाटे १.२३ वाजता सुरू होईल आणि रात्री ११.१० वाजता समाप्त होईल. पहाटे ते दुपारी २ वाजून ३२ वाजेपर्यंत श्रवण नक्षत्र आहे. या दिवशी ब्रह्म मूहूर्त पहाटे ४ वाजून ५ मिनिटे ते ४ वाजून ४५ मिनिटापर्यंत असणार आहे.
जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला ‘अंगारकी चतुर्थी’ म्हणून ओळखले जाते. म्हणून या दिवसाला ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’ असे म्हणतात. हिंदू धर्मशस्त्रानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावे पुजा आणि श्रीगणेशाची आराधना केली तर भक्तांना अपेक्षित फळ मिळते.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे ड्रग्जच्या विळख्यात; ड्रग्ज सेवन करणाऱ्या २ तरुणींचा व्हिडिओ व्हायरल
-Pune Drugs Party: पुण्याची संस्कृती टिकवण्यासाठी मेधा कुलकर्णींनी पोलिसांना दिले ‘हे’ आदेश