पुणे : पुणे शहरातील एफसी रोडवरील नामांकित ‘द लिक्विड लिझर लाऊंज’ या हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी सुरु होती. या पार्टीमध्ये ड्रग्ज सेवन करतानाचा २ अल्पवयीन तरुणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात देखील अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. अशातच आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पुणे शहरातील एका हॉटेलच्या वॉशरुममध्ये २ तरुणी ड्रग्जचे सेवन करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरुन आता हा व्हिडीओ पुण्यातील पुणे-नगर रस्त्यावरील हॉटेल मधील असल्याचा दावा करण्यात येत आहे. पुणे शहरामध्ये ड्रग्जचे प्रमाण वाढले असल्याचे वारंवार दिसून येत आहे. पुणे पोलीस या व्हिडीओचा अधिक तपास करत आहेत.
पुण्यातील हॉटेलच्या वॉशरुमध्ये ड्रग्ज घेताना २ तरुणी#Pune #DrugsFreeBharat #Drugs #FCRoad pic.twitter.com/YWd13nQbsw
— Sonali Indu Narayan Chavan (@Sona_chavan96) June 24, 2024
‘द लिक्विड लिझर लाऊंज’ या हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून त्या तरुणांचा शोध सुरु आहे. तसेच या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या सर्व तरुणांची ओळख पटवण्याचे काम पुणे पोलीस करत आहेत, असे पुणे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांनी सांगितले आहे.
दरम्यान, पुण्यात वाढत चाललेल्या ड्रग्ज प्रकरणावरुन काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नुकताच व्हायरल झालेला व्हिडीओ कोणत्या हॉटेलमधला आहे? हे पोलिसांच्या तपासातून समोर येईल.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Drugs Party: पुण्याची संस्कृती टिकवण्यासाठी मेधा कुलकर्णींनी पोलिसांना दिले ‘हे’ आदेश
-शरद पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र म्हणाले, “निवडणूक यादीतून ‘पिपाणी’ हटवा अन्यथा…”