पुणे : पुणे शहरात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी सत्रामुळे पुण्याची संस्कृती बिघडत चालली आहे. यावर आता राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी भाष्य केले आहे. ‘पुणे शहराची सांस्कृतिक ओळख कुठल्याही पद्धतीने बदलू दिली जाणार नाही, गैरगोष्टी अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्वरित आणि कडक कारवाईचे दिले आहेत’, असे मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत.
“पुणे पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येऊन पुणे शहरांमधील सर्व अवैध गोष्टींना आळा घालावा. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या आयुक्तांनीही अवैध अनधिकृत व बार आणि रूप टॉप हॉटेल्सवर त्वरित कार्यवाही कारवाई करावी अशी आग्रहाची मागणी केली आहे”, असे मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत.
काँग्रेसच्या एका आमदाराने (रविंद्र धंगेकर) आणि विरोधी पक्षाच्या एका महिला पदाधिकारी यांनी यापूर्वी जे आरोप केले होते, त्याचा त्यांनी काय पाठपुरावा केला? त्या विषयात ते गप्प का? माझी मागणी आहे की एक्साईज खात्यातील अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या बद्दल त्या आरोपांचे काय झाले? याची चौकशी झाली पाहिजे. आता ते गप्प का? अशा प्रकारचा प्रश्न जनता उपस्थित करीत आहे. त्यांनी जे आरोप केले होते त्या पोलीस अधिकाऱ्यांची आणि एक्साईज अधिकाऱ्यांची चौकशी करून ते जर दोषी असतील तर अशा दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाही करावी आणि जर ते दोषी नसतील तर खोटे आरोप केल्याबद्दल कारवाही करावी अशा प्रकारची आग्रही मागणी मी करीत आहे, असेही मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र म्हणाले, “निवडणूक यादीतून ‘पिपाणी’ हटवा अन्यथा…”
-Weather Update: महाराष्ट्रात मान्सून दमदार; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज
-पुणे ड्रग्ज पार्टी: सामाजिक संघटनांचा आक्रमक पवित्रा; एल थ्री बारवर पतीत पावन संघटनेकडून दगडफेक