पुणे : यंदा राज्यात मान्सूनने वेळेच्या आधीच हजेरी लावली आहे. मान्सूनची वाटचाल अंदमान निकोबारपासून चांगली राहिली आहे. त्या ठिकणी २१ मे ऐवजी १९ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे. वेळेच्या आधी दाखल झालेल्या मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच सरासरी प्रमाणापेक्षा सर्वाधिक पाऊस झाला असल्याची नोंद देखील करण्यात आली आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमध्ये २ दिवस आधीच ३० मे रोजी मान्सून दाखल झाला. कोकणात ६ जून रोजी वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला आहे. त्यानंतर ८ जून रोजी पुणे आणि ९ जून रोजी मुंबईसह, ठाणे या भागात मान्सून दाखल झाला आहे. राज्यातील सातारा, रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर इतर सर्व ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे.
बंगाल उपसागरात मान्सूनच्या पावसाला अनुकूल बदल झाल्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. त्यातच उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे ड्रग्ज पार्टी: सामाजिक संघटनांचा आक्रमक पवित्रा; एल थ्री बारवर पतीत पावन संघटनेकडून दगडफेक
-‘मी पालकमंत्री होतो तेव्हा…’; चंद्रकांत पाटलांनी नाव न घेता अजित पवारांवर साधला निशाणा
-पुणे ड्रग्ज प्रकरण पुन्हा चर्चेत; या प्रकरणात महिला अन् परदेशी नागरिकांचाही समावेश
-Pune Drugs Party: ‘त्या’ व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक निलंबित