पुणे : एफसी रोडवरील नामांकित हॉटेल द लिक्विड लिझर लाऊंजमध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरणाने डोकं वर काढलं असून शहरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आता हॉटेलवर पतित पावन संघटनेकडून दगडफेक करण्यात आली आहे. तसेच शाईफेकही करण्यात आली आहे.
या ड्रग्ज प्रकरणावरुन सध्या शहरात संतापाची लाट उसळली असून अनेक सामाजिक संघटनांकडून आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळत आहे. त्यातच पुणे पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली आहे. आतापर्यंत ८ जणांवर कारवाई झाली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील या दोघांना निलंबित करण्यात आले आहे.
डेक्कन परिसरातील एल थ्री द लिक्विड लिझर लाऊंज या हॉटेलमध्ये पहाटेपर्यंत मद्य पार्टी आणि त्यामधून ड्रग्ज सेवन सुरू असल्याचे समोर आले होते. त्याचा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला होता. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे हे सर्व प्रकार अद्याप देखील सुरू असल्याचे समोर आले असून सर्वसामान्यांसह विरोधक सरकारवर ताशेरे ओढताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मी पालकमंत्री होतो तेव्हा…’; चंद्रकांत पाटलांनी नाव न घेता अजित पवारांवर साधला निशाणा
-पुणे ड्रग्ज प्रकरण पुन्हा चर्चेत; या प्रकरणात महिला अन् परदेशी नागरिकांचाही समावेश
-Pune Drugs Party: ‘त्या’ व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक निलंबित