पुणे : सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन रान पेटलं आहे. मराठा आंदोलक सरकारकडे मागण्या करत आहेत आणि त्याकडे सरकार कानाडोळा करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. त्यातच या आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारने आरक्षणाचा तिढा सोडवावा, अशी मागणी करताना त्यासाठीचा तोडगाही सुचविला आहे.
तमिळनाडूमध्ये तत्कालीन केंद्र सरकारने जी पावलं उचलली होती. तीच पावलं आत्ताच्या केंद्र सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात उचलावी आणि मराठा आरक्षण रद्द होऊ देऊ नये, या संदर्भात पूर्वीपासून संसदेत मी भांडत आलो आहे. दुर्दैवाने केंद्र सरकारने त्यात लक्ष घातले नाही. माझी सरकारला विनंती आहे की, मराठा आरक्षणासंदर्भात कायदा करावा आणि समाजातला कोणताही व्यक्ती या आरक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी’, असेही ओमराजे निंबाळकर यांनी सुचवले आहे.
आज देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.श्री शरदचंद्र पवार साहेब यांची पुणे येथील निवासस्थानी आमदार कैलास पाटील यांच्यासह सदिच्छा भेट घेतली..!
माझ्या लोकसभा निवडणुकीत मा.पवार साहेबांनी प्रत्यक्ष सभा, बैठका घेऊन आशीर्वाद दिले होते. त्यामुळं… pic.twitter.com/sPCK9Ql5yN
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) June 23, 2024
‘गेल्या अडीच वर्षामध्ये जे पक्षफुटीचे राजकारण झाले. लोकशाही मार्गाने ज्यांनी पक्ष स्थापन केले होते, त्यांनाच ते नाही म्हटले गेले. पक्षातून बेदखल करण्यात आले. चिन्ह काढून घेण्यात आली. निवडणूक आयोगाला हाताशी धरून आणि जनतेला गृहीत धरून जो काही हा प्रकार करण्यात आला होता, त्याला लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने उत्तर दिले आहे’, असे ओमराजे निंबाळकर म्हणाले आहेत.
‘जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. तेव्हा लोकसभेमध्ये मी पहिला खासदार होतो, ज्याने याबाबत आपले मत ठामपणे मांडले होते. सर्व जाती धर्मांमध्ये सलोखा असणे, ही पुरोगामी महाराष्ट्राची गरज आहे आणि जर दोन जातींमध्ये तेढ निर्माण होत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी असून ते रोखणे सरकारची जबाबदारी आहे. जी आश्वासने सरकारने आंदोलकांना दिली आहे, ती पूर्ण करण्याची देखील जबाबदारी सरकारची आहे, असे ओमराजे निंबाळकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शिंदेंच्या उमेदवाराकडून पैसे वाटप? व्हिडिओ पुढे आणत अंधारेंकडून पोलखोल; नेमकं काय घडलं? वाचा
-आजारी बहिणीला संपवलं अन् रचला बनाव, १८ वर्षीय भावाचं चीड आणणारे कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या