पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावमध्ये एक सभा झाली. या सभेला अनेक शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संस्थाचालक उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्र्यांची ही सभा संपताच शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले. ज्या शाळेतून ६ किंवा ६ पेक्षा जास्त शिक्षक आलेले आहेत. अशा शाळांच्या प्रमुखांना बोलवून किंवा त्यांच्या मुख्याध्यापकांना बोलवून पैसे वाटपाचा कार्यक्रम झाला. असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. यासंदर्भातील व्हिडीओ सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर शेअरही केला आहे.
“या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. मी अनुसता हवेत आरोप केला नाही, तर मी पुराव्या दाखल तो व्हिडिओ दिलेला आहे. यावर जर विरोधकांचे म्हणणं असेल की, हा तो व्हिडिओ नाही तर मला सभेतले व्हिडीओ पण आता दाखवावे लागतील. सभेतल्या व्हिडीओमध्ये जे पैसे घेताना ते लोक आहेत त्याच कॉस्ट्यूममध्ये तेच चेहरे सभेमध्ये बसलेले आहेत. रितसर आमच्यापक्षाच्या वतीने माझं पक्षातल्या काही ज्येष्ठ नेत्यांशी बोलणं झालं खासदार संजय राऊतांशी बोलणं झालं आणि आमच्या पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई हे या संबंधाने पुढची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहेत. कायदेशीर मार्गाने पक्षाच्यावतीने आम्ही निवडणूक आयोगाकडे याची तक्रार दाखल करणार आहे”, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आजारी बहिणीला संपवलं अन् रचला बनाव, १८ वर्षीय भावाचं चीड आणणारे कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
-पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती; राष्ट्रवादी काँग्रेस आमदारच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं
-प्रदेशाध्यक्ष पुण्यात अन् काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, अंतर्गत वाद चव्हाटयावर