पुणे : लोकसभा निवडणुकीत पुण्यात काँग्रेस विरुद्ध भाजपमध्ये निवडणूक रंगली त्यामध्ये काँग्रेसला पराभव मिळाला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात बैठक पार पडली. मात्र नाना पटोले पुणे दौऱ्यावर असताना बैठकीपूर्वी पडण्यापूर्वी एका कार्यकर्त्याच्या बॅनरमुळे मोठा वाद रंगल्याचे पहायला मिळाले. बॅनर झळकवणाऱ्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली या मारहाणीत त्याच डोकं फुटलं आणि कार्यकर्ता रक्त बंभाळ झाला आहे.
मारहाण करणारे पाच ते सहा कार्यकर्ते होते. या मधील एका कार्यकर्त्याला पळून जात असताना पोलिसांनी पकडले आहे. मुकेश मधुकरराव धिवार असं त्या कार्यकर्त्याच नवा आहे. पुणे काँग्रेसचा जुना पदाधिकारी आहे. अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचा माजी अध्यक्ष आणि आता राहुल प्रियांका गांधी सेना राज्य प्रमुख आहे.
आबा बागुल यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या दरम्यान देखील काँग्रेसभवन बाहेर बॅनर झळकवले होते. तर आज पुन्हा एक बॅनर त्याच्याकडून झळकवण्यात आले आहे. ज्यामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची नावे लिहिण्यात आली आणि प्रश्न विचारण्यात आला की, आता तरी या जगामध्ये बदल होणार का नाही?
बॅनरवर पहिले नाव होते ते काँग्रेसचे माजी मंत्री राहिलेले, उल्हास पवार, पुन्हा एक जेष्ठ मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी शहर अध्यक्ष रमेश बागवे, माजी नगरसेवक अभय छाजेड, माजी महापौर दीप्ती ताई चौधरी, माजी महापौर कमल ताई व्यवहारे, काँग्रेस नेते वीरेंद्र किरड, काँग्रेस नेते संजय बालगुडे. अशा नेत्यांची नावे बॅनर वर होती. पण ज्या नेत्याचे बॅनरवर नाव नव्हते त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती मिळत आहे.
‘काँग्रेस पक्ष लोकशाही आणि संविधान मानणारा पक्ष आहे’, असं सातत्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आणि तळा गळतल्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून म्हंटल जाते. मात्र, अपल्याच पक्षातील कार्यकर्त्यानी संविधानाप्रमाणे केलेली मागणी काँग्रेच्या त्या नेत्याला का सहन झाली नाही? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. मारहाण करणाऱ्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. परंतु मारहाण झालेल्या मुकेश धिवार यांनी अद्यापही तक्रार दाखल केलेली नाही.
महत्वाच्या बातम्या-
-देशात पेपरफुटीविरोधी कायदा लागू; कारवाईची तरतूद काय असणार? वाचा सविस्तर…
-‘अजितदादांना एकटं पाडलं जातंय त्यांनी महायुती सोडावी अन्…’; राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचं वक्तव्य
-ससूनचे नवे अधिष्ठता डॉ. एकनाथ पवारांची डॉक्टरांना तंबी; म्हणाले, ‘रुग्णांना बाहेरुन…’
-‘हे सरकार जातीयवादी, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरु केला’; नाना पटोलेंची सरकावर आगपाखड