पुणे : पावसाळा सुरु झाला आणि शहरातील मंंगळवार परिसरामध्ये डेंग्युचे रुग्ण आढळले आहेत. मंगळवार पेठेमधील सदाआनंद नगरमध्ये २० संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी ९ जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात एकाच भागात मोठ्या संख्येने डेंग्यू रुग्ण सापडल्याने पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
जून महिन्यात डेंग्यूचे ६३ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील २१ या रुग्ण या आठवड्यात आढळले आहेत. डासोत्पत्ती स्थाने आढळल्याप्रकरणी महापालिकेकडून ५६० निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना नोटीस बजाविण्यात आली असून, १ लाख ६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
“सदाआनंदनगरमध्ये डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. या रुग्णांना कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिसरात सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. डेंग्यूसदृश लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार केले जात आहेत”, असे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले आहेत.
सदाआनंदनगरमधील घरांची तपासणी आरोग्य विभागाने केली. तिथे नळाचे पिण्याचे पाणी चांगले असल्याचे आढळून आले. मात्र, इमारतीच्या टाक्यांमध्ये दूषित पाणी आढळून आले. याप्रकरणी संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत, असेही डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘मी बारामतीची जबाबदारी दुसऱ्यांवर दिली होती, पण…’; शरद पवारांचा अजितदादांना अप्रत्यक्ष टोला
-वारकऱ्यांना सर्व सोईसुविधा द्या, हेमंत रासनेंची पालिककडे आग्रही मागणी; शिष्टमंडळासह घेतली भेट
-‘लोकसभेत आम्हाला एकही जागा नाही, आता….’ विधानसभेच्या किती जागांवर आठवलेंनी केला दावा?
-महायुतीत वाद? रुपाली ठोंबरे म्हणाल्या, ‘अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपला नाही तर…’
-पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीची ताकद वाढणार; ‘या’ दोन नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता