पुणे : संपूर्ण महाराष्ट्रातून पायी वारी करणारे वारकरी देहू, आळंदी ते पंढरपूरपर्यंत जातात. दरवर्षीप्रमाणे पुणे शहारातून कसबा विधानसभा मतदारसंघातून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखींचा मुक्काम ३० जून आणि १ जुलै २०२४ रोजी असणार आहे. या दोन्ही दिवशी विश्रामबाग आणि भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात हजारो दिंड्या आणि लाखो वारकरी मुक्कामासाठी असतात.
या दोन्ही पालखीसोबत असणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक पायाभूत सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांनी पुणे महानगरपालिका जनरल सहाय्यक आयुक्त रविंद्र बिनवडे यांना निवेदन दिले आहे.
‘पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कसबा विधानसभा मतदारसंघात आवश्यक पायाभूत सोयी-सुविधा, पाणी पुरवठा, दिवसभर वैद्यकीय सुविधा, फिरते शौचालय आणि मंडप व्यवस्था विविध भागांमध्ये उपलब्ध करून द्यावी’, अशी मागणी हेमंत रासने यांनी केली आहे.
“पालखी सोहळा हा सर्वांसाठी आनंद देणारा आहे. दरवर्षी लाखो वारकरी पायी वारी करून पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. यानिमित्ताने पुण्यनगरीत येणाऱ्या वारकरी संप्रदायासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम आम्ही करणार आहोत. याचबरोबर वारकऱ्यांना पाणी पुरवठा, वैद्यकीय सहाय्यता, फिरते शौचालय आणि आवश्यक मंडप व्यवस्था मिळवून देण्यासाठी आज आम्ही रविंद्र बिनवडे आणि पृथ्वीराज बी. पी. यांनी निवेदन दिले आहे”, असे हेमंत रासने म्हणाले आहेत.
यावेळी कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, तेजेंद्र कोंढरे, योगेश समेळ, राजेश येनपुरे, मनिषा लडकत, गायत्रीताई खडके, उदय लेले, राजू परदेशी, छगन बुलाखे, विष्णूआप्पा हरिहर, विजयालक्ष्मी हरिहर, अर्चना पाटील, सुनील खंडागळे तसेच कसबा मतदारसंघाचे सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, चंद्रकांत पोटे, उमेश चव्हाण, कल्याणी नाईक तसेच कसबा मतदारसंघातील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-‘लोकसभेत आम्हाला एकही जागा नाही, आता….’ विधानसभेच्या किती जागांवर आठवलेंनी केला दावा?
-महायुतीत वाद? रुपाली ठोंबरे म्हणाल्या, ‘अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपला नाही तर…’
-पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीची ताकद वाढणार; ‘या’ दोन नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता
-अजित पवारांना पुन्हा तोंडावर पाडण्यासाठी शरद पवारांचा ‘मास्टर’ प्लॅन; सलग ३ दिवस बारामती दौऱ्यावर
-रुपाली ठोंबरे राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा; घेतली अजित पवारांची भेट, म्हणाल्या, ‘दादा…’