पुणे : आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्यातच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि भाजपची ताकद वाढण्यासाठी तसेच शहरातील आमदारांना बळ देण्यासाठी शहरातील तसेच पिंपरी चिंचवडमध्ये या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे.
सध्या शहरामध्ये अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मंत्रीपद आहे. तरी आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांना आणि पिंपरी-चिंचवडचे अजित पवार गटाचे आमदार आण्णा बनसोडे यांना मोठी ताकद मिळणार असून या दोघांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. शहरामध्ये भाजप अन् राष्ट्रवादीमधून हे दोघे प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, ‘मुंबईला येण्याबाबत मला सध्या तरी निरोप आलेला नाही. मी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना भेटण्यासाठी मुंबईला निघालो आहे. विस्ताराबाबत माझी त्यांच्याशी चर्चा झाली नाही. मुख्यमंत्र्यांकडे मतदारसंघातील काम घेऊन जात असतो. मंत्रिमंडळाचा विस्तार पाठीमागेच व्हायला हवा होता. परंतु, लोकसभेचा निकाल पाहिला त्या दृष्टीने मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे जेणेकरून मंत्र्यांच्या त्या-त्या मतदारसंघात प्रभाव पडेल. मंत्रिपदासाठी मी नेहमीच आशावादी आहे’, असे आण्णा बनसोडे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांना पुन्हा तोंडावर पाडण्यासाठी शरद पवारांचा ‘मास्टर’ प्लॅन; सलग ३ दिवस बारामती दौऱ्यावर
-रुपाली ठोंबरे राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा; घेतली अजित पवारांची भेट, म्हणाल्या, ‘दादा…’
-रोहित पवारांच्या ट्विटची महाराष्ट्र पोलीस विभागाने घेतली दखल; पोलीस भरतीबाबत ‘हा’ मोठा निर्णय
-मिलियन्समध्ये फॉलोवर्स असणारी X-mau मयुरी पवार गायब; पोलिसांकडून शोध सुरू