पुणे : महाराष्ट्र राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु होण्यासाठी आता फक्त ३ ते ४ दिवस बाकी आहेत. मात्र, पोलीस भरतीसाठी काहीच दिवस शिल्लक राहिले असताना उमेदवारांमध्ये प्रचंड गोंधळ झाला आहे. पोलीस भरतीच्या शिपाई पदासह इतर काही पदांसाठी उमेदवारांनी अर्ज केलो होता. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीच्या पाठोपाठ आलेल्या तारखांवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
पोलीस भरतीचे जे वेळापत्रक आले त्यामध्ये मैदानी चाचणीच्या तारखा पाठोपाठ आल्याने उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सोशल मीडियावर याबाबत अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या. ‘वर्षानुवर्षे भरतीची तयारी करायची पण ऐन भरतीच्या वेळेसच सरकारकडून अशाप्रकारचा सावळा गोंधळ निर्माण केल्याने विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागतोय. तरी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता पोलीस भरती व SRPF भरतीच्या तारखा बदलाव्या’, अशी विनंती रोहित पवार यांनी केली होती.
पोलीस भरती आणि SRPF भरतीची मैदानी परीक्षा एकच दिवशी आल्याने राज्यभरातील विद्यार्थांच्या भावना लक्षात घेऊन पोलीस भरती करणाऱ्या युवांना दोन्ही मैदानी परीक्षांना परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे आभार! आता ऐन पावसाळ्यात भरती प्रक्रिया होत असल्याने मैदानी चाचणीस येणाऱ्या… https://t.co/BCcNrViChW pic.twitter.com/Q9t5LlDeDq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 17, 2024
“पोलीस भरती २०२२-२३ मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत व त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. उमेदवारांना अडचण/शंका असल्यास त्यांनी [email protected] यावर ईमेल करावा” pic.twitter.com/JUlcgn86cv
— महाराष्ट्र पोलीस – Maharashtra Police (@DGPMaharashtra) June 16, 2024
अखेर उमेदवारांच्या आणि रोहित पवारांच्या मागणीला यश आले असून पोलीस विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाने याबाबत निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरणेसाठी त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी लागोपाठचे दिवशी २ पदांकरिता मैदानी चाचणी साठी हजर राहण्याची बाबतची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे उमेदवरांची गैरसोय होवू शकते. म्हणून सर्व घटक प्रमुखांना व माहिती विभागास सूचना देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मिलियन्समध्ये फॉलोवर्स असणारी X-mau मयुरी पवार गायब; पोलिसांकडून शोध सुरू
-लोकसभा पराभवानंतर RSS इन ॲक्शन मोड; ‘मोतीबागेत’ नेत्यांची परेड; नेमकं घडतंय काय?
-अजित पवार गटाचे आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक; मंत्रिमंडळात स्थान मिळणार का?
-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक; असा ठरला जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला