पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमादार आण्णा बनसोडे हे मंत्रिपदासाठी आशावादी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आण्णा बनसोडे हे पिंपरीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ‘राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर व्हावा जेणेकरुन त्या-त्या मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात प्रभाव पाडता येईल. मंत्री पदासाठी मी नेहमीच आशावादी आहे’, असे आण्णा बनसोडे म्हणाले आहेत.
मुंबईला बोलावण्याचा निरोप आलेला नाही. मी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना भेटण्यासाठी मुंबईला निघालो आहे. विस्ताराबाबत माझी त्यांच्याशी चर्चा झाली नाही. मुख्यमंत्र्यांकडे मतदारसंघातील काम घेऊन जात असतो. मंत्रिमंडळाचा विस्तार पाठीमागेच व्हायला हवा होता. परंतु, लोकसभेचा निकाल पाहिला त्या दृष्टीने मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे जेणेकरून मंत्र्यांच्या त्या- त्या मतदारसंघात प्रभाव पडेल, असे आण्णा बनसोडे म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता अजित पवारांचे कट्टर समर्थक आण्णा बनसोडे हे मंत्रिपदासाठी आशावादी असताना त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळते का? हे पाहणे महत्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक; असा ठरला जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
-राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; आंब्यांच्या पेट्यांमधून विदेशी मद्य जप्त
-शिंदेंच्या शिवसेनेला पुण्यात हव्यात ३ जागा, भाजप आणि राष्ट्रवादीच्या ‘या’ मतदारसंघांवर दावा
-‘असा विजय काय कामाचा जो…?.’; सुषमा अंधारेंचा रवींद्र वायकरांना सवाल
-संजय राऊतांनी राणेंवर केलेल्या ‘त्या’ टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘त्यांचा घोडा…’