पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरण देखील पुण्यातूनच उघडकीस आले. त्यानंतर आता आणखी पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोव्यामध्ये विक्रीची परवानगी असलेल्या विदेशी मद्याची आंब्यांच्या पेट्यांमधून तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उघडकीस आणला आहे.
बारामतीतील मोरगाव-सुपा रस्त्यावर करण्यात आलेल्या कारवाईत गोव्यातील १२ लाख ६१ हजारांच्या मद्याच्या बाटल्या, तसेच मालवाहू वाहन (पिकअप) असा ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चाैघांना अटक करण्यात आली आहे. नामदेव हरीभाऊ खैरे, संदीप बबन सानप, गोरख भगवान पालवे, महेश गुलाबराव औताडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी संशय न येण्यासाठी गोव्यातील मद्याच्या बाटल्या पिकअप वाहनात ठेवलेल्या आंब्याच्या पेटीत लपवल्याचे उघडकीस आले. गोव्याहून अहमदनगरकडे हे (पिकअप) वाहन जात असताना उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत, उपअधीक्षक उत्तम शिंदे, सुजित पाटील, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक माेरगाव-सुपा रस्त्यावर गस्त घालत होते. गाेव्यातील मद्याची तस्करी एका वाहनातून करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील दौंड विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानंतर मुर्टी गावाजवळ पथकाने एका मोटारीसह पिकअप वाहनाची तपासणी केली आहे. चौकशीत चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने पाहणी केली. तेव्हा पिकअप वाहनात मद्याच्या बाटल्या सापडल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शिंदेंच्या शिवसेनेला पुण्यात हव्यात ३ जागा, भाजप आणि राष्ट्रवादीच्या ‘या’ मतदारसंघांवर दावा
-‘असा विजय काय कामाचा जो…?.’; सुषमा अंधारेंचा रवींद्र वायकरांना सवाल
-संजय राऊतांनी राणेंवर केलेल्या ‘त्या’ टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘त्यांचा घोडा…’
-आता बारमध्ये बसून दारु पिण्यासाठीही लागणार ‘हे’ सरकारी दस्ताऐवज
-मुलींना मोफत शिक्षण यंदापासूनच! सरकारची संपूर्ण तयारी, नेमकी कधी होणार अंमलबजावणी? वाचा