पुणे : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला राज्यामध्ये जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. मुबई उत्तर-पश्चिम मतदारसंघामध्ये खासदार रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनचा वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ईव्हीएमशी जोडलेला फोनच वायकरांच्या मेहुण्याला वापरायला दिल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘आम्ही हरलोय म्हणजे तुम्ही जिंकला कसं होत नाही. डाव तुमच्या हाती दिला तरी जिंकता तुम्हाला येत नाही’, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. ‘एवढं सगळं होऊनही वायकर यांना वाटतं का खरंच आपण जिंकलोय? त्यांचे अंतर्मन त्यांना जराही खात नाही का? निती अनिती, नितिमत्ता या सगळ्याची आम्ही भाजपकडून अपेक्षाच करत नाही’, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
आम्ही हरलोय म्हणजे तुम्ही जिंकला कसं होत नाही डाव तुमच्या हाती दिला तरी जिंकता तुम्हाला येत नाही.. !@RavindraWaikar @AmolGKirtikar @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @ pic.twitter.com/OaiCXiu1MO
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) June 16, 2024
जे वायकर साहेब मातोश्रीच्या आणि वंदनीय बाळासाहेबांच्या सानिध्यात राहिले त्यांच्यासाठी नितिमत्ता काहीना काही मॅटर करत असेलच? खरंच वायकर साहेबांना वाटतं की तुम्ही जिंकला आहात? असा विजय काय कामाचा जो घेऊन तुम्ही जिथे जिथे जाल तिथे लोक तुमच्याकडे तुम्ही पराभूत आहात अशाच नजरेने बघत राहतील?, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-संजय राऊतांनी राणेंवर केलेल्या ‘त्या’ टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘त्यांचा घोडा…’
-आता बारमध्ये बसून दारु पिण्यासाठीही लागणार ‘हे’ सरकारी दस्ताऐवज
-मुलींना मोफत शिक्षण यंदापासूनच! सरकारची संपूर्ण तयारी, नेमकी कधी होणार अंमलबजावणी? वाचा
-महाराष्ट्र्रात मान्सूनची वाटचाल मंदावली, ‘या’ राज्यात अलर्ट जारी!