पुणे : पुणे शहरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सध्या मद्यपी आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यातच अल्पवयीन मुलेही मद्यपान करत नशेत गाड्या चालवत असतात. अशात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असतात. या पार्श्वभूमीवर आता मद्यप्रेमींसाठी शासनाने आता नियम तयार केले आहे. शासनाप्रमाणे आता पब, बार मालकांनी पुढाकार घेतला आहे.
पुण्यासारख्या त्यामुळे आता मुंबई पुण्यात बार, पबमध्ये दारु पिण्यापूर्वी वयाचा पुरावा तपासला जाणार आहे. सरकारी ओळखपत्रातील वय त्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. वाईन आणि बियर पिण्यासाठी २१ वर्ष वय तर दारू पिण्यासाठी २५ वर्ष वय बंधनकारक असणार आहे. अल्पवयीन मुलांना बारआणि पबमध्ये प्रवेश मिळू नये, यासाठी प्रवेश द्वारावरच ओळखपत्र तपासले जाणार आहेत. अनेक पब चालकांनी ओळखपत्र दाखवल्याशिवाय दारू न देण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातामध्ये अग्रवाल बिल्डर पुत्र अल्पवयीन मुलाने मद्याच्या नशेत भरधाव कार चालवत दोघांना उडवले होते. त्यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र माध्यम आणि जनतेच्या रेट्यामुळे या प्रकरणात ९ पेक्षा जास्त लोकांना अटक झाली होती. या प्रकरणात पोलीस प्रशासनावर सडकून टीका झाली. त्यामुळे खळबळून जागे झालेल्या पब, बार चालकांनी आता आपलीच कठोर नियमावली तयार केली आहे. यामुळे मुंबई अन् पुण्यात मद्य अन् वाईन पितांना वयाचा पुरावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुलींना मोफत शिक्षण यंदापासूनच! सरकारची संपूर्ण तयारी, नेमकी कधी होणार अंमलबजावणी? वाचा
-महाराष्ट्र्रात मान्सूनची वाटचाल मंदावली, ‘या’ राज्यात अलर्ट जारी!
-दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; जगताप दीर-भावजईला शरद पवार गटाची खुली ऑफर
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: बकरी ईदनिमित्त ‘या’ ठिकाणच्या वाहतुकीत मोठे बदल