पुणे : पुणे शहरात सुरु असलेल्या मेट्रोच्या कामामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. तसेच शहरात शनिवार, रविवारी देखील रस्त्यावर प्रचंड गर्दी होत असते. शनिवार, रविवारी आठवडे सुट्ट्या असल्यामुळे अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडतात. त्यामुळे देखील रस्त्यावर चांगलीच वाहतूक कोंडी होते. त्यातच आता शनिवार, रविवार आणि सोमवारी सलग ३ दिवस लागून सुट्ट्या आल्यामुळे रस्त्यावर आणखीच गर्दी झाली आहे.
शनिवार, रविवार आठवडे सुट्टी तर सोमावारी बकरी ईद असल्यामुळे गोळीबार मैदान चौक परिसरातील वाहतूक व्यवस्थेत सोमवारी सकाळी सहानंतर बदल करण्यात येणार आहे. गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गोळीबार मैदान चौक, मम्मादेवी चौक, ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक) परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. गोळीबार मैदान चौकातून शंकरशेठ रस्तामार्गे स्वारगेटकडे जाणारा मार्ग सर्वप्रकारच्या वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी गोळीबार मैदान चौकातून वळून सीडीओ चौक, उजवीकडे वळून गुलटेकडीमार्गे इच्छितस्थळी जाण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.
शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकाकडून गोळीबार मैदान चौकाकडे जाणारी वाहतूक पर्याची मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी सॅलसबरी पार्क, सीडीओ चौक, भैरोबानाला चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. सोलापूर रस्त्याने गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी मम्मादेवी चौक, बिशप स्कूलमार्गे किंवा नेपीयर रस्तामार्गे, सीडीओ चौकातून जाता येईल.
सीडीओ चौकातून गोळीबार मैदानाकडे येणारा रस्ता सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. कोंढवा, लुल्लानगरमार्गे येणाऱ्या वाहनांनी खटाव बंगला चौक, नेपीयर रस्ता, मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार, भैरोबा नाला चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांनी पालिकेकडून ‘तो’ महत्वाचा अधिकार काढला अन् पुणे पोलिसांकडे सोपवला
-महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता; नेमकं कारण काय?
-रवींद्र वायकरांच्या नातेवाईकांने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन; तपासात धक्कादायक माहिती